ओटीटी विश्व म्हणजे अक्षरशः मनोरंजनाचा खजिनाच आहे. अनेक लोक घरी बसून छान ओटीटीवरचे काही चित्रपट एन्जॉय करताना दिसतात. अगदी जुन्या प्रसिद्ध चित्रपटांपासून ते काल-परवा आलेल्या चित्रपटापर्यंत सगळेच चित्रपट आता ओटीटीवर बघता येतात. तुम्ही देखील या आठवड्यात घरीच बसून काही चित्रपट बघण्याचा प्लॅन करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी ही खास यादी घेऊन आलो आहोत...
'द केरळ स्टोरी' हा चित्रपट तुफान हिट ठरला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटात अदा शर्मा महत्त्वाच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
वाचा: 'देश सर्वात पहिला', पूनम पांडेने केले मालदीवमधील शूट रद्द
एका फूड डिलीव्हरी करणाऱ्या मुलाची गोष्ट 'ज्विगेटो'चित्रपटात दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नंदिता दासने केले आहे.
दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या 'सालार' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. १२ जानेवारी हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. आता चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.
शाहरुख खानचा 'डंकी' हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर हवी तशी कमाई केली नाही. आता हा चित्रपट जिओ सिनेमा या ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.
सलमान खान आणि कतरिना कैफ महत्त्वाच्या भूमिकेत असणारा 'टायगर ३' हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर हवी तशी कमाई केली नाही.
'एजेंट' हा चित्रपट २०२३मध्ये सुपरफ्लॉप ठरला होता. सिनेमागृहात निराशाजनक कामगिरी केलेला हा चित्रपट आता ओटीटीवर रिलीज होण्यास सज्ज आहे.
संबंधित बातम्या