मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  The Kerala Story: अदा शर्माचा ‘द केरळ स्टोरी’ ओटीटीवर रिलीज होणार! कधी आणि कुठे? जाणून घ्या...

The Kerala Story: अदा शर्माचा ‘द केरळ स्टोरी’ ओटीटीवर रिलीज होणार! कधी आणि कुठे? जाणून घ्या...

Feb 07, 2024 05:45 PM IST

The Kerala Story OTT Release: गेल्या काही दिवसांपासून 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा आहे.

The Kerala Story OTT Release
The Kerala Story OTT Release

The Kerala Story OTT Release: बॉक्स ऑफिसवर कल्ला करणारा 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट आता अखेर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा आहे. तर, कोणताही ओटीटी प्लॅटफॉर्म हा चित्रपट प्रदर्शित करण्यास तयार नसल्याचे देखील बोलले जात होते. मात्र, आता प्रेक्षकांची ही प्रतीक्षा अखेर संपणार असून, हा चित्रपट याच महिन्यात डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ४० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने २४१ कोटींहून अधिकची कमाई केली होती. तर, जगभरात देखील या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली होती.

‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचे निर्माते चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्यासाठी मोठ्या रकमेची मागणी करत असल्याने हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित केला जाणार नसल्याचे म्हटले जात होते. बॉलिवूडच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या यादीमध्ये सामील असलेल्या 'द केरळ स्टोरी'च्या ओटीटी रिलीजबाबत बराच गदारोळ झाला होता. यामुळेच गेल्या वर्षी ५ मे रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट आतापर्यंत ओटीटीवर प्रदर्शित होऊ शकला नव्हता. मात्र, आता याला अखेर मुहूर्त मिळाला आहे. ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट या महिन्यात म्हणजेच १६ फेब्रुवारी २०२४ रोजी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ‘झी ५’ या ओटीटी प्लॅटफॉर्म रिलीज होणार आहे.

Tejaswini Pandit: अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या ट्विटची अवघ्या महाराष्ट्रात चर्चा, असं काय आहे त्यात?

'द केरळ स्टोरी' हा चित्रपट काही खऱ्या घटनांनी प्रेरित असल्याचे निर्मात्यांनी म्हटले होते. ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट चार मुलींची कथा सांगणारा आहे, ज्यात अदा शर्मा मुख्य भूमिकेत दिसली आहे. अदा म्हणजेच शालिनी एका पारंपारिक हिंदू कुटुंबातील आहे. तर, तिची मैत्रीण गीतांजली मेनन ही एका कम्युनिस्ट कुटुंबातून आली आहे आणि तिसरी एक मुलगी निमा आहे. या सर्व मुली केरळमधील कासारगोडच्या नर्सिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतात. त्यांच्यासोबत आणखी एक मुलगी या कॉलेजमध्ये शिकत असून, ती मलप्पुरमची असिफा आहे. ही चौथी मुलगी या इतर तीन मुलींशी मैत्रीपूर्ण वागते आणि नंतर त्यांचा ब्रेन वॉश करते.

ट्रेंडिंग न्यूज

असिफा ही कट्टरतावादी असून आयएसआयएससाठी मुलींना देशाबाहेर पाठवण्याचे काम करते. या चित्रपटात दाखवण्यात आले आहे की, असिफा तिच्या साथीदारांच्या मदतीने तिघींचेही ब्रेनवॉश करते आणि त्यांना धर्म बदलण्यासाठी तयार करते. त्यातून फातिमा इराक-सीरिया सीमा ओलांडून पोहोचते. 'द केरळ स्टोरी' ही अशाच ३२ हजार मुलींची सत्यकथा आहे.

WhatsApp channel