ओटीटी प्रेमींसाठी हा आठवडा चांगला असणार आहे. कारण या आठवड्यात अनेक नव्या वेब सीरिज आणि चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. प्रेक्षकांना घरबसल्या मनोरंजन हवे असते. त्यामुळे आता या आठवड्यात ओटीटीवर काय प्रदर्शित होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चला पाहूया या आठवड्यात कोणते नवे चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होणार आहेत. ..
कपिल शर्माच्या कॉमेडी शोचा दुसरा सीझन येत आहे. शोच्या दुसऱ्या सीझनमध्ये आलिया भट्ट, सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, ज्युनिअर एनटीआर, सैफ अली खान, जान्हवी कपूर आणि द फॅब्युलस लाईफ ऑफ बॉलिवूड वाइव्सची स्टारकास्ट दिसणार आहे. हा शो नेटफ्लिक्सवर २१ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता प्रसारित होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागली आहे.
ए वेरी रॉयल स्कँडलमध्ये प्रिन्स अँड्र्यूची मुलाखत घेणाऱ्या एमिली मेटलीची कहाणी दाखवण्यात येणार आहे. हा शो आजपासून अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर स्ट्रीम होणार आहे.
वॉट्स नेकस्ट? द फ्यूचर विद बिल गेट्स या मिनी वेब सीरिजमध्ये बिल गेट्स तुम्हाला तंत्रज्ञानाच्या भवितव्याबद्दल सांगणार आहेत. येत्या १८ सप्टेंबरला नेटफ्लिक्सवर ही सीरिज प्रदर्शित होणार आहे.
थलेवट्टम पालम हा ओटीटीच्या लोकप्रिय वेब सीरिज 'पंचायत'चा रिमेक आहे. हा रिमेक 'थलेवट्टम पालम' या नावाने बनवण्यात आला असून तो तमिळ भाषेत बनवण्यात आला आहे. हिंदीमध्ये सचिव ही भूमिका जितेंद्र कुमार यांनी साकारली होती. तर, अभिषेक कुमार तमिळमध्ये ही भूमिका साकारत आहे. ही सीरिज 20 सप्टेंबरला अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर रिलीज होणार आहे.
रजनीकांतचा 'लाल सलाम' हा चित्रपट आता प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट २० सप्टेंबररोजी सन एनएक्सटीवर येणार आहे. राजकीय मतभेद या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत.
चियान विक्रमचा 'तांगलान' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केल्यानंतर ओटीटीवर धडकणार आहे. हा चित्रपट २० सप्टेंबररोजी नेटफ्लिक्सवर विविध भाषांमध्ये येणार आहे.
वाचा: प्रेक्षकांसाठी खुशखबर! ९९ रुपयांमध्ये पाहा मल्टीप्लेक्समध्ये सिनेमा, वाचा कधी आणि कुठे?
परेश रावल यांचा कॉमेडी चित्रपट 'जो तेरा है वो मेरा है' २० सप्टेंबररोजी जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात परेश रावल यांच्यासह फैजल मलिक, सोनाली कुलकर्णी, सोनाली सेहगल यांच्याही भूमिका आहेत.