विनोदवीर सुनील पाल हे बेपत्ता झाल्याची माहिती त्यांच्या पत्नीने दिली होती. ते ऐकून चाहत्यांना चिंता वाटत होती. ही बातमी वणव्यासारखी सोशल मीडियावर पसरली आणि पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली. पण त्यानंतर काही तासांनी सुनील पाल घरी परतले. त्यांनी स्वत: सर्व काही ठीक असल्याचे सांगितले. आता सुनील पाल यांच्या पत्नीने व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवत सर्व काही ठीक असल्याचे सांगितले आहे. मात्र, तिच्या पोस्टमध्ये काही गोष्टी नेटकऱ्यांना खटकल्या आहेत.
सुनील पाल यांच्या पत्नीचे नाव सरिता पाल आहे. सरिताने आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर लिहिलं आहे की, "सर्व काही ठीक आहे, आम्ही लवकरच आमच्या हितचिंतकांना नेमकं काय घडले हे सांगणार आहोत. एकदा पोलिसांनी पूर्ण जबाब घेतल्यानंतर आणि एफआयआरशी संबंधित प्रक्रिया केल्यानंतर आम्हाला बोलण्याची परवानगी आहे." सरिताची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. आता सुनील पालची पत्नी आपल्या पतीच्या बेपत्ता होण्याबाबत कोणते गुपित उघड करणार यासाठी नेटकरी आतुर आहेत.
सुनील पाल हे शहराबाहेर गेले होते आणि मंगळवारी परतणार होते. पण ते परत न आल्याने सर्वजण चिंतेत होते. पाल यांचा फोन बंद असल्याने सरिताने सांताक्रूझ पोलिसांत तक्रार दाखल केली. पण नाट्यमय पद्धतीने तक्रार दाखल झाल्यानंतर काही तासांतच सुनील पाल घरी परतले. त्यांच्या पत्नीने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, ती आत्ता जास्त काही सांगू शकणार नाही पण तो अजूनही पोलिस स्टेशनमध्येच आहे आणि सुनीलने तो परत येत असल्याचा संदेश पोलिसांमार्फत पाठवला होता.
वाचा: हिंदी मालिकांमध्ये काम करणारी 'ही' लोकप्रिय अभिनेत्री आहे राजा गोसावी यांची लेक
सुनील पाल यांच्याप्रमाणेच काही महिन्यांपूर्वी 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या टीव्ही मालिकेतील अभिनेता गुरचरण सिंगही अचानक गायब झाला आणि त्याचे बेपत्ता होणे हे बराच काळ गूढच राहिले. नंतर सोढी परत आला आणि आपण ध्यानासाठी गेलो असल्याचे सांगितले. सुनील पाल प्रकरणाबद्दल बोलायचे झाले तर आता चाहते सुनील पाल यांच्या पुढील पोस्टची वाट पाहत असतील. सुनील पाल २००५ मध्ये 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या टीव्ही शोचा विजेता होता आणि त्यानंतर ते काही चित्रपटांमध्ये दिसले.
सुनील पाल यांनी BollywoodShaadi.com सांगितले की, ही घटना २ डिसेंबर रोजी घडली होती. हरिद्वारमध्ये परफॉर्म करण्यासाठी सुनील पाल यांना बोलावण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी त्याला एक कार देण्यात आली आणि ही गाडी मध्येच बदलण्यात आली होती. 'माझ्या गाडी बदलल्यानंतर मला भीती वाटू लागली होती. ती कुठून आणली गेली माहीत नाही. त्यांनी मला सांगितले की त्यांना २० दशलक्ष डॉलर्सची आवश्यकता आहे. मी भीतीपोटी म्हणालो की ते २० लाख नाहीत. मी तुम्हाला १० लाख देण्याचा प्रयत्न करू शकतो. ते एटीएम कार्ड मागत होते. मी त्याला म्हणालो की मी हे सर्व ठेवत नाही. त्यांनी गाडीत बसून माझ्यासोबत व्यवहार केला. ३-४ मित्रांकडे पैशांची मागणी केली. पण जर मी पैसे गोळा केले तर ते कोणाला द्यायचे हे मला माहित नव्हते' असे सुनील म्हणाले.
पुढे ते म्हणाले, पैसे दिल्यानंतर त्यांनी सुनील पालला सोडले. डोळ्यावर पट्टी बांधून विमानप्रवास केला. सुनीलने सांगितले की, अपहरणकर्त्यांनी त्याला ३५ हजार रुपये अॅडव्हान्स दिले होते. दिल्लीत पोहोचल्यानंतर आणखी ५० टक्के रक्कम दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले होते.