Rekha : इच्छा माझी पुरी करा म्हणत चाहता रेखाच्या गाडीसमोर झोपला अन्... अभिनेत्रीने शेअर केला भन्नाट किस्सा!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rekha : इच्छा माझी पुरी करा म्हणत चाहता रेखाच्या गाडीसमोर झोपला अन्... अभिनेत्रीने शेअर केला भन्नाट किस्सा!

Rekha : इच्छा माझी पुरी करा म्हणत चाहता रेखाच्या गाडीसमोर झोपला अन्... अभिनेत्रीने शेअर केला भन्नाट किस्सा!

Dec 08, 2024 10:40 AM IST

Rekha At The Great Indian Kapil Show : बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री रेखा यांनी नुकतीच ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी अनेक भन्नाट किस्से शेअर केले.

बॉलीवुड एक्ट्रेस रेखा
बॉलीवुड एक्ट्रेस रेखा

The Great Indian Kapil Show : बॉलिवूडची सदाबहार सुंदरी रेखा यांनी नुकतीच 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये हजेरी लावली होती. या मंचावर रेखा यांची एंट्री होताच सगळं माहोल बदलून गेला. वयाच्या ७० व्या वर्षीही आपल्या सौंदर्याने भल्याभल्यांना घायाळ करणाऱ्या रेखा यांनी या कार्यक्रमात अनेक किस्से शेअर केले. यावेळी रेखा यांनी कपिल शर्माच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आणि गाणी गाण्यापासून ते नृत्यापर्यंत आपल्या अदा दाखवून चाहत्यांची मने जिंकली. यावेळी देखील त्यांनी अमिताभ बच्चन यांची आठवण काढली. अमिताभ बच्चन होस्ट करत असलेल्या 'कौन बनेगा करोडपती' या रिअॅलिटी शोचा प्रत्येक एपिसोड त्या कशा आतुरतेने बघतात आणि त्यातला प्रत्येक संवाद कसा लक्षात ठेवते हे सांगितले. 

त्याचवेळी रेखाने कपिल शर्माच्या शोमध्ये त्यांच्या एका वेड्या चाहत्याचा किस्साही सांगितला, जो तिच्या कारसमोर झोपला होता.

रेखाने सांगितला वेड्या चाहत्याचा किस्सा

‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये आलेल्या रेखा यांना कपिलने प्रश्न विचारलं की, तुम्ही कधी अशा एखाद्या चाहत्याला भेटला आहात का, जो कायम तुमच्या लक्षात राहिला? यावर एक किस्सा सांगताना रेखा यांनी म्हटलं की, मला असे लाखो चाहते मिळाले आहेत आणि असाच एक चाहता होता जो थेट माझ्या गाडीसमोर येऊन झोपला होता.

Dharmendra Birthday : बॉलिवूडचे एव्हरग्रीन सुपरस्टार, धर्मेंद्र यांचे 'हे' गाजलेले ५ चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

चाहता गाडीसमोर झोपला अन्

'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये पाहुणा म्हणून आलेल्या रेखाने सांगितले की, जेव्हा त्यांची कार निघत होती, तेव्हा एक फॅन त्यांच्या कारसमोर जाऊन कसा झोपला होता. रेखा यांनी बाहेर बाकून बघताच, चाहता ‘मला मारून टाका’, असे मोठमोठ्याने ओरडू लागला. चाहता म्हणत होता की, गाडीतून उतरून मला मिठी मारली नाहीस तर मी जीव देईन? यावर रेखा खूपच गोंधळात पडल्या होत्या. त्यांनी समोर बसलेल्या प्रेक्षकांना विचारलं की, तुम्हाला काय वाटतं मी काय केलं असेल? त्यांनी चाहत्यांना हा प्रश्न विचारला. 

यावर एक जण म्हणाला, की तुम्ही नक्कीच चाहत्याला मिठी मारली असेल. यावर रेखा म्हणाल्या अगदी बरोबर. आपले चाहते हेच आपलं यश आहेत. असं आपल्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या चाहत्यांच्या या प्रेमाला नकार कसा देणार.. मी त्या चाहत्याला आनंदाने मिठी मारली. रेखा यांचं हे उत्तर ऐकून चाहते देखील खूप खुश झाले.  

Whats_app_banner