छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय 'द ग्रेट कपिल शर्मा शो' काही दिवसांपूर्वीच सुरु झाला आहे. पण आता या शो बंद होणार असल्याची माहिती समोर आली आहे. केवळ दोन महिन्यातच हा शो प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे. खराब व्युअरशिप आणि पडणारा टीआरपी पाहाता नेटफ्लिक्सने हा शो बंद करण्याचा निर्णय घेतल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आता या सर्वावर अर्चना पुरण सिंहने प्रतिक्रिया दिली आहे.
'द ग्रेट कपिल शर्मा शो'ला सोशल मीडियावर सतत ट्रोल केले जात आहे. पण या शोच्या संपूर्ण टीमने ट्रोलर्सचा प्रश्नांचा एकदम हसतहसत उत्तर दिले आहे. सोशल मीडियावर या शोच्या एका प्रोमोने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
वाचा: गौतमी पाटीलचं नशीब चमकलं! ‘द महाराष्ट्र फाइल्स’ सिनेमातील हिंदी गाण्यावर थिरकरणार
'द ग्रेट कपिल शर्मा शो' चा नवा प्रोमो शेअर करत वाहिनीने, 'कुछ तो लोग कहेंगे, बोलणे आणि चर्चा करणे हे लोकांचे काम आहे, आमचे का तर तुम्हाला हसवणे आहे' असे म्हटले आहे. तसेच व्हिडीओमध्ये शो बंद होणार असल्याच्या काही हेडलाइन्स शेअर करण्यात आल्या आहेत. या चर्चांवर उत्तर देत, आम्हाला असे वाटले की आम्हीच खूप चांगली कॉमेडी करतो असे म्हटले आहे. त्यानंतर संपूर्ण कपिल शर्माची टीम जोरजोरात हसताना दिसत आहे. त्यानंतर कॉमेडीचा ब्लॉकबस्टर असलेला हा शो लवकर बंद होणार नसल्याचे म्हटले आहे.
वाचा: बिग बॉस फेम वीणा जगतापचे छोट्या पडद्यावर पुनरागम, 'या' मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार
सोनी वाहिनीने शेअर केलेल्या 'द ग्रेट कपिल शर्मा शो'च्या प्रोमोमध्ये कोणते कलाकार दिसणार हे सांगितले आहे. या शोच्या आगामी भागात राजकुमार राव, जान्हवी कपूर, अनिल कपूर, अनिल कपूर, फराह खान, सानिया मिर्झा, एड शिरीन, बादशाह हे कलाकार येणार आहेत. त्यामुळे आगामी भागाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.
वाचा: गौरव मोरेने सोडला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रम, काय आहे कारण? जाणून घ्या
द ग्रेट कपिल शर्मा शोची कायम स्वरुपाची पाहुणी अर्चान पुरण सिंहने हा प्रोमो शेअर केला आहे. हा प्रोमो शेअर करत तिने, 'हे लाफ्टर कधीही कमी नाही होणार कारण अजून बरेच एपिसोड याणे बाकी आहेत' असे कॅप्शन दिले आहे. तसेच यापूर्वी कीकू शारदने देखील एका मुलाखतीमध्ये यावर प्रतिक्रिया दिली आहे. 'शो इतक्यात संपणार नाही. फक छोटासा ब्रेक घेण्यात आला होता. दुसऱ्या सिझनची तयारी झाली आहे' असे कीकू म्हणाला होता.
द ग्रेट कपिल शर्मा या कॉमेडी शोसाठी कपिल शर्मा किती मानधन घेतो असा प्रश्न सर्वांना पडतो. हिंदुस्तान आणि डीएनए इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, कपिल शर्मा पाच एपिसोडचे मिळून जवळपास २६ कोटी रुपये घेतो. म्हणजे प्रत्येक एपिसोडसाठी तो जवळपास पाच कोटी रुपये घेतो. सुनिल ग्रोवर एका एपिसोडसाठी २५ लाख रुपये मानधन म्हणून घेतो. तर अर्चना पूरण सिंह एका एपिसोडसाठी १० लाख रुपये मानधन घेते. कृष्णा अभिषेक पण १० लाख, किकू शारद ७ लाख आणि राजीव ठाकूर ६ लाख रुपये फी घेतात.