मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ‘द कपिल शर्मा शो’ दोन महिन्यातच होणार बंद? अर्चना पूरण सिंहने चाहत्यांना दिला झटका

‘द कपिल शर्मा शो’ दोन महिन्यातच होणार बंद? अर्चना पूरण सिंहने चाहत्यांना दिला झटका

Aarti Vilas Borade HT Marathi
May 03, 2024 07:52 AM IST

द कपिल शर्मा शो सर्वांचा आवडता कार्यक्रम आहे. सर्वजण आनंदाने हा कार्यक्रम पाहातात. आता हा कार्यक्रम बंद होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

‘द कपिल शर्मा शो’ दोन महिन्यातच होणार बंद? अर्चना पूरण सिंहने चाहत्यांना दिला झटका
‘द कपिल शर्मा शो’ दोन महिन्यातच होणार बंद? अर्चना पूरण सिंहने चाहत्यांना दिला झटका

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय विनोदी शो म्हणून 'द कपिल शर्मा शो' पाहिला जातो. काही दिवसांपूर्वी हा शो बंद करण्यात आला होता. त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी शो मध्ये बदल करत पुन्हा हा शो सुरु करण्यात आला होता. पण आता हा शो केवळ दोन महिन्यात ऑफ एअर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. शोमध्ये परीक्षक म्हणून बसलेली अर्चनी पूरण सिंहने याबाबत माहिती दिली आहे. ते ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अर्चनाने गुरुवारी तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो'च्या सेटवर कापण्यात आलेल्या केकचा फोटो शेअर केला आहे. या फोटोवर तिने 'सिझन संपले' असे कॅप्शन दिले आहे. अर्चनाची ही स्टोरी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. अनेकांना हे पाहून धक्का बसला. काहींनी या फोटोंवर कमेंट करत नाराजी व्यक्त केली आहे.
वाचा: 'तुला पाहते रे' मालिकेतील अभिनेत्रीचे छोट्या पडद्यावर पुनरागम, नवा प्रोमो प्रदर्शित

एक सिझन संपला

पिंकविलाशी संवाद साधताना अर्चनाने द कपिल शर्मा शो ऑफ एअर जाण्याबाबत माहिती दिली होती. 'हो, आम्ही द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शोच्या एका सिझनचे शुटिंग पूर्ण केले आहे. आम्ही काल या सिझनच्या शेवटच्या एपिसोडचे शुटिंग पूर्ण केले. आमचा आता पर्यंतचा प्रवास खूप मजेशीर होता. आम्ही सेटवर एक वेगळा वेळ घालवला' असे अर्चना म्हणाली.
Heeramandi Review: अंगावर शहारे आणणारी सीरिज! संजीदा शेख सोनाक्षी सिन्हा हिचावर भारी

२ महिन्यातच संपला सिझन

कपिल शर्मा हा जगभरात प्रसिद्ध असलेला कॉमेडीयन आहे. नेटफ्लिक्सवर त्याचा हा शो ३० मार्च रोजी सुरु झाला आहे. जवळपास दोन महिन्यांपेक्षाच्या कमी कालावधीमध्ये हा शो संपणार आहे. या शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये रणबीर कपूर, नीतू कपूर आणि रिद्धिमा साहनी पाहुणे म्हणून आले होते. दुसऱ्या भागात रोहित शर्मा, श्रेयस अय्यर शोचा भाग बनले होते. लोकांना हा भाग प्रचंड आवडला होता.
वाचा: 'विकृत चाळे' म्हणून ट्रोल करणाऱ्याला अभिनेत्री हेमांगी कवीचे सडेतोड उत्तर

या कॉमेडी शोसाठी कपिल किती मानधन घेतो

या कॉमेडी शो साठी कपिल शर्मा तगडे मानधन घेत आहे. हिंदुस्तान आणि डीएनए इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, कपिलला पाच एपिसोडचे जवळपास २६ कोटी रुपये दिले जात होते. प्रत्येक एपिसोडसाठी तो पाच कोटी रुपये घेतो. सुनिल ग्रोवर एका एपिसोडसाठी २५ लाख रुपये घेतो. तर अर्चना पूरण सिंह एका एपिसोडचे १० लाख रुपये घेते. कृष्णा अभिषेक १० लाख, किकू शारद ७ लाख आणि राजीव ठाकूर ६ लाख एका एपिसोडचे घेत आहेत.

IPL_Entry_Point

विभाग