New OTT Released: ओटीटी लव्हरसाठी धमाकेदार होणार दिवाळी! एक-दोन नव्हे तर नवे तीन सिनेमे होणार प्रदर्शित
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  New OTT Released: ओटीटी लव्हरसाठी धमाकेदार होणार दिवाळी! एक-दोन नव्हे तर नवे तीन सिनेमे होणार प्रदर्शित

New OTT Released: ओटीटी लव्हरसाठी धमाकेदार होणार दिवाळी! एक-दोन नव्हे तर नवे तीन सिनेमे होणार प्रदर्शित

Aarti Vilas Borade HT Marathi
Oct 28, 2024 02:51 PM IST

New OTT Released: अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ, नेटफ्लिक्स आणि झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नवे सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. आता हे सिनेमे कोणते चला जाणून घेऊया...

New OTT Released
New OTT Released

New OTT Released: दिवाळीचा आठवडा सिनेरसिकांसाठी खूप खास असणार आहे. कारण चित्रपटगृहांसोबतच ओटीटी प्लॅटफॉर्मवर काही नवे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. एकीकडे बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया ३' आणि अभिनेता अजय देवगणचा 'सिंघम अगेन' चित्रपटगृहात एकत्र प्रदर्शित होणार आहे. तर दुसरीकडे ओटीटीवर तीन नवे सिनेमे आणि 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा नवा एपिसोड येत आहे. ओटीटीवर येणाऱ्या नवीन कंटेंटबद्दल आम्ही तुम्हाला यासाठी सांगत आहोत जेणेकरुन तुमचा दिवाळी विकेंड खूप चांगला जाईल.

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा नवा एपिसोड

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा पुढचा भाग २ नोव्हेंबर ला ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर टेलिकास्ट होणार आहे. यावेळी कपिलच्या शोमध्ये 'भूल भुलैया ३'ची स्टारकास्ट कार्तिक आर्यन, विद्या बालन आणि तृप्ती डिमरी दिसणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता कार्तिक, विद्या आणि तृप्ती कपिलसोबत काय धमाल करणार हे पाहण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.

'मिथ्या द डार्क चॅप्टर' नवा सिनेमा

बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी, अवंतिका दासानी आणि नवीन कस्तुरिया यांचा 'मिथ्या द डार्क चॅप्टर' हा चित्रपटही दिवाळीच्या निमित्ताने प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांचे दिवाळीच्या सुट्टीत घरबसल्या मनोरंजन व्हावे यासाठी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट १ नोव्हेंबर २०२४ रोजी झी ५ वर प्रदर्शित होणार आहे.

'जोकर २'

चित्रपटगृहात हिट झाल्यानंतर आता हॉलिवूडचा लोकप्रिय चित्रपट 'जोकर २' ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट २९ ऑक्टोबररोजी अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट सध्या भाड्याने असणार आहे. जर तुम्हाला हा सिनेमा पाहायचा असेल तर तुम्हाला आधी अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ सबस्क्राइब करावा लागेल आणि नंतर चित्रपट भाड्याने घ्यावा लागेल.
वाचा: भाजपच्या 'या' माजी महिला खासदाराने साकारली होती अशोक सराफ यांच्या मुलीची भूमिका

'थंगलन'

दाक्षिणात्य सुपरस्टार चियान विक्रमचा 'थंगलन' हा चित्रपट आता चित्रपटगृहांमध्ये सुपरहिट ठरल्यानंतर आता ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ३१ ऑक्टोबर २०१४रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर धडकणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात होते.

दिवाळीच्या सुट्टीत घरबसल्या काय पाहावे असा प्रश्न आता प्रेक्षकांना पडला आहे. कारण ओटीटीवर तीन आणि चित्रपटगृहामध्ये दोन सिनेमे प्रदर्शित होणार आहेत.

Whats_app_banner