मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  पूर्व पत्नी रीना दत्ता हिने आमिर खान याच्या लगावली होती कानशि‍लात, काय होते कारण?

पूर्व पत्नी रीना दत्ता हिने आमिर खान याच्या लगावली होती कानशि‍लात, काय होते कारण?

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 28, 2024 08:19 AM IST

आमिर खान याने नुकताच 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये हजेरी लावली. त्यावेळी पूर्व पत्नी रीना दत्ता हिने कानशि‍लात लगावल्याचे सांगितले आहे. त्यामागे काय कारण होते चला जाणून घेऊया..

पूर्व पत्नी रीना दत्ता हिने आमिर खान याच्या लगावली होती कानशि‍लात, काय होते कारण?
पूर्व पत्नी रीना दत्ता हिने आमिर खान याच्या लगावली होती कानशि‍लात, काय होते कारण?

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून आमिर खान ओळखला जातो. तो आजवर फारच कमी वेळा पुरस्कार सोहळे, छोट्या पडद्यावरील कॉमेडी शोमध्ये हजेरी लावताना दिसतो. त्याने कित्येक वर्षानंतर शनिवारी, 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये हजेरी लावली. या शोचा नवा एपिसोड नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. शोमध्ये आमिर खानने त्याच्या खासगी आयुष्यावर भाष्य केल्याचे पाहायला मिळाले. त्याने पूर्व पत्नी रीना दत्ताविषयी देखील वक्तव्य केले आहे. एक वेळ अशी होती की रीनाने आमिर खानच्या कानशि‍लात लगावली होती. त्यामागचे कारण देखील आमिरने सांगितले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

कपिल शर्मा शोमध्ये आमिर खानला विचारण्यात आले होते की तू लोकांचे निरिक्षण करतोस का? त्यावर आमिरने हा म्हणताच कपिलने मजेशीर अंदाजात, 'तुम्ही तर घरातून देखील बाहेर पडत नाही, मग कुठे लोकांचे निरिक्षण केले?' असे म्हटले. ते ऐकून सर्वांना हसू अनावर झाले. त्यानंतर आमिरने एक किस्सा सांगितला. तो किस्सा ऐकून कपिल देखील चकीत झाला.
वाचा: ‘आमच्या पप्पांनी गंपती आणला’ गाण्यामधील चिमुकला साईराज याचे नशीब फळफळले! दिसणार 'या’ मालिकेत

रीनाने लगावली आमिरच्या कानशिलात

आमिरने सांगितले की जेव्हा त्याची पत्नी रीना दत्त लेबर रुममध्ये जुनैदला जन्म देत होती तेव्हा तो तिच्यासोबत होता. आमिर तिला श्वासोच्छवासाची प्रक्रिया सांगत होता. तसेच करण्यासाठी प्रोत्साहन देत होता. 'जेव्हा तिच्या पोटात खूप दूखू लागले तेव्हा मी तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होतो. याचा परिणाम असा झाला की रीनाने एकदम जोरात माझ्या कानशिलात लगावली आणि म्हणाली तुझी बकवास बंद कर' असे आमिर म्हणाला.
वाचा: 'बाईपण भारी देवा' सिनेमा घरबसल्या पाहायला? मग जाणून घ्या कधी आणि कुठे पाहायला मिळणार

आमिरने निरिक्षण केल्या या गोष्टी

रीनाला प्रचंड पोटात दुखत होते. प्रत्येक महिलेला डिलिवरी होताना खूप पोटात दुखते. तेव्हा मला कळाले की जेव्हा दुखणे एका ठराविक पातळीनंतर वाढले की आपण डोळे बंद घट्ट दाबून बंद करतो. पण जेव्हा अति दुखणे सुरु होते तेव्हा माणसाच्या चेहऱ्यावरील हावभाव आश्चर्यचकीत करण्यासारखे असतात. जेव्हा रीनाला लेबर पेन होत होते आणि ते असह्य जेव्हा झाले तेव्हा तिचा चेहरा पूर्ण बदलून जायचा.
वाचा: अमिताभ बच्चन यांचं शेजारी व्हायचंय? मोजावी लागणार मोठी किंमत! जाणून घ्या काय आहे नेमकी भानगड

IPL_Entry_Point

विभाग