जेव्हा जेव्हा कॉमेडीची चर्चा होते तेव्हा विनोदवीर कपिल शर्माचे नाव आवर्जुन घेतले जाते. कपिल शर्माचे चाहते त्याच्या टीव्ही शोची आतुरतेने वाट पाहत असतात. नुकताच कपिल शर्माने आपल्या चाहत्यांसाठी नेटफ्लिक्सवर 'द ग्रेट इंडियन कपिल शो' आणला होता. प्रेक्षकांना हा शो खूप आवडला. हा शो संपल्यानंतर प्रेक्षक त्याच्या दुसऱ्या सिझनची आतुरतेने वाट पाहात आहेत. या प्रतिक्षेदरम्यान कपिल शर्माने आपल्या चाहत्यांना मोठी आनंदाची बातमी दिली आहे.
कॉमेडियन कपिल शर्माने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये एक फोटो आहे. या फोटोत फुलांचा पुष्पगुच्छ दिसत आहे. हा पुष्पगुच्छ शेअर करत, 'द ग्रेट इंडियन कपिल शोचा दुसरा सीझन लवकरच येत आहे' असे कॅप्शन दिले आहे. पुष्पगुच्छासोबत द ग्रेट इंडियन कपिल शोच्या संपूर्ण कलाकारांचा फोटोही दिसत आहे. त्यामुळे लवकरच या शोचा दुसरा सिझन येणार असल्याचे म्हटले जात आहे.
द ग्रेट इंडियन कपिल शोचा दुसरा सीझन कधी येणार आणि त्याचा पहिला पाहुणा कोण असेल याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, सीझन 2 ची घोषणा होताच चाहत्यांची उत्कंठा वाढली आहे. द ग्रेट इंडियन कपिल शोच्या पहिल्या सीझनमध्ये १२ एपिसोड होते या सीझनचे पहिले पाहुणे रणबीर कपूर, नीतू कपूर आणि रिद्धिमा कपूर होते.
वाचा: हॉरर आणि कॉमेडीचा डबल डोस! तिकिट बूक करण्यापूर्वी वाचा 'स्त्री २'चा रिव्ह्यू
द ग्रेट इंडियन कपिल शो ३० मार्च रोजी सुरू झाला आणि त्याचा शेवटचा भाग २२ जून रोजी प्रसारित झाला. या सीझनचे शेवटचे पाहुणे होते कार्तिक आर्यन आणि त्याची आई. कार्तिक आर्यन त्याच्या चंदू चॅम्पियन या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये आला होता. सीझन १ मध्ये सनी देओल, मेरी कोम, परिणीती चोप्रा आणि दिलजीत दोसांझ सारखे अनेक पाहुणे आले.