Arjun Kapoor Viral Video : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर सध्या त्याच्या आगामी 'मेरे हस्बंड की बीवी' या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी सज्ज होत आहे. चित्रपट रिलीज होण्याआधी तो या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहे. नुकताच अर्जुन त्याच्या दोन्ही सहकलाकार भूमी पेडणेकर आणि रकुल प्रीत सिंहसोबत चाहत्यांशी संवाद साधताना दिसला. यावेळी त्याला पाहून कुणीतरी मलायकाचं नाव घेतलं, त्यानंतर अर्जुनला आपण नेमकी काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळत नव्हतं. एक्स गर्लफ्रेंडचं नाव ऐकल्यावर अभिनेता चांगलाच गोंधळून गेला होता.
अर्जुन कपूरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात अर्जुन स्टेजवर आहे आणि रकुल, भूमी दोघींसोबत चाहत्यांशी संवाद साधत आहे. यावेळी भूमिला कोणीतरी विचारले की, तिला हा चित्रपट का आवडला आणि करावा वाटला? भूमी काही उत्तर देण्याआधीच अर्जुनला पाहून कोणीतरी जोरजोरात मलायकाच्या नावाचा जयघोष सुरू केला.
गर्दीतला हा आवाज अर्जुनलाच नाही, तर सर्वांनाच ऐकू आला. मात्र, हा आवज येताच अर्जुनही नुसता बघत बसला, पण तो काहीच बोलला नाही, फक्त किंचितस हसला. यानंतर रकुल आणि भूमी दोघींनीही अर्जुनकडे पाहिलं, पण कोणीच काही बोललं नाही. भूमीने तिला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं, तर रकुल अर्जुनकडे पाहून थोडी हसली. मात्र, असं अचानक घडताच अर्जुन कपूर कमालीचा गोंधळून गेला होता.
अर्जुन आणि मलायकाचं गेल्या वर्षी ब्रेकअप झालं होतं. अर्जुनने स्वत: याला दुजोरा दिला आहे. ‘सिंघम अगेन’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये जेव्हा कोणी मलायकाचं नाव घेतलं, तेव्हा अर्जुन म्हणाला, ‘नाही, मी आता सिंगल आहे, रिलॅक्स व्हा.’ मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनी २०१८ मध्ये एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. दोघं एकत्र सुट्टीवर जायचे आणि एकमेकांसोबतचे फोटो ही सोशल मीडियावर शेअर करायचे, पण त्यानंतर २०२४ साली दोघांनी हे नातं तोडलं. त्यांचं ब्रेकअप सगळ्यांसाठीच धक्कादायक होतं. मात्र, आता दोघेही आपापल्या मार्गांनी पुढे जात आहेत.
अर्जुन कपूरच्या 'मेर हस्बंड की बीवी' या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक मुदस्सर अजीज करत आहेत. या चित्रपटात डीनो मोरिया, हर्ष गुजराल आणि शक्ती कपूर यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट २१ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.
संबंधित बातम्या