बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक लोकप्रिय अभिनेत्री परवीन बाबी यांचा आज (४ एप्रिल) स्मृतिदिन आहे. परवीन बाबीचा जन्म ४ एप्रिल १९४९ रोजी गुजरातमधील जुनागढ येथे झाला होता. खूप बोल्ड आणि बिनधास्त असलेली पर्ण बाबी एकेकाळी बॉलिवूडवर राज्य करत होती. इतकी प्रसिद्धी असलेली अभिनेत्री एका बंद खोलीत मृत्य पावली आणि याबद्दल कुणाला कळलं देखील नव्हतं. परवीन बाबीची ही शोकांतिका बॉलिवूडमध्ये खूप चर्चिली गेली. परवीन बाबी यांचा हा दुःखद शेवट अनेक चाहत्यांच्या डोळ्यात पाणी आणले.
परवीन बाबीचे पूर्ण नाव परवीन वली मोहम्मद अली खान बॉबी असे होते. परवीनचा जन्म तिच्या आई-वडिलांच्या लग्नाच्या तब्बल १४ वर्षांनी झाला होता. परवीन बाबी अवघ्या १० वर्षांची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. परवीन बाबीने १९७२मध्ये मॉडेलिंगमधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. लवकरच तिला चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. १९७३मध्ये आलेल्या 'चरित्रम' चित्रपटातून परवीन बाबी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर दिसली. १९७४मध्ये रिलीज झालेला 'मजबूर' हा परवीनचा पहिला हिट चित्रपट होता. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत परवीन बाबीची जोडी जमली होती.
१९७० ते १९८०च्या दरम्यान परवीनने 'दीवार', 'नमक हलाल', 'अमर अकबर अँथनी' आणि 'शान' सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. या काळात, परवीन बाबी ही रीना रॉयनंतर सर्वात जास्त मानधन घेणारी दुसरी अभिनेत्री होती. परवीनने अमिताभ बच्चन यांच्यासोबत आठ चित्रपटांमध्ये काम केले असून, हे सर्व चित्रपट हिट किंवा सुपरहिट ठरले. परवीन बाबीने या काळात शशी कपूरपासून ते धर्मेंद्रपर्यंत सर्वच आघाडीच्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे.
परवीन बाबीने कधीही लग्न केले नाही. मात्र, तिचे नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडले गेले होते. दिग्दर्शक महेश भट्ट, अभिनेता कबीर बेदी आणि खलनायकाची भूमिका करणारे डॅनी यांच्यासोबत तिचे नाते खूप गाजले. एकेकाळी परवीन आणि अमिताभ बच्चन यांच्या नात्याच्याही अफवा पसरल्या होत्या. मात्र, तिने नंतर अमिताभवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. पण, काही वर्षांनी हा गैरसमज असल्याचे समोर आले.
१९७६मध्ये प्रसिद्ध 'टाइम' मासिकाने परवीन बाबीला आपल्या कव्हर पेजवर स्थान दिले होते. १९८३मध्ये परवीन बाबी तिचे फिल्मी करिअर आणि भारत सोडून अमेरिकेला गेली. परवीनला लहान वयातच मधुमेह झाला होता. नेहमीप्रमाणे दूध आणि वर्तमानपत्र घेण्यासाठी बाहेर येणाऱ्या परवीनने तीन दिवस तिच्या मुंबईतील घराचा दरवाजा उघडला नाही, तेव्हा २२ जानेवारी २००५ रोजी शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर परवीनचा मृतदेह तिच्या घरातून अत्यंत वाईट अवस्थेत बाहेर काढण्यात आला होता.
संबंधित बातम्या