Aamir Khan Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती फाटक्या आणि विचित्र कपड्यांमध्ये रस्त्यांवर फिरताना दिसला आहे. त्याची अवस्था पाहता ही व्यक्ती शुद्धीतच नाही, असे वाटत होते. त्याचे स्वरूपही खूप विचित्र दिसत होते. जणू काही आदिमानवच रस्त्यावर फिरत आहे, असे वाटत होते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, रस्त्यावर विचित्र अवस्थेत फिरणारी ही व्यक्ती बॉलिवूडचा एक मोठा सुपरस्टार आहे. या व्यक्तीला बघून तुम्हाला ओळख पटली का?
तुम्ही कदाचित या व्यक्तीला अजूनही ओळखले नसेल. या आदिमानवाप्रमाणे रस्त्यावर फिरणाऱ्या व्यक्तीचे नाव जरी आम्ही तुम्हाला सांगितले तरी तुमचा विश्वास बसणार नाही. खरं तर, ही व्यक्ती दुसरी कोणी नसून बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात आमिर खान आहे. या व्हिडिओमध्ये आमिर खान तपकिरी रंगाचा ड्रेस घालून रस्त्यावर फिरताना दिसत आहे. त्याचे रूप पाहून लोकही त्याला घाबरून त्याच्यापासून दूर पळून जात आहेत. लांब केस आणि दाढीमुळे कोणीही अंदाज लावू शकत नाही की, तो आमिर खान आहे.
या व्हायरल व्हिडिओमध्ये तपकिरी रंगाचा आदिमानवासारखा पोशाख घातलेला एक माणूस रस्त्यावर फिरत असल्याचे दिसून येते. या व्यक्तीला पाहून काही लोक घाबरलेलेही दिसत आहेत. रस्त्यावर इकडे तिकडे हिंडणारी ही व्यक्ती वस्तू फेकतानाही दिसत आहे. हे सर्व पाहिल्यानंतर तुमचा विश्वास बसत नसेल की, हा आमिर खान आहे. तर, याचा पुरावाही आमच्याकडे आहे. आमिर खानचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो या लूकमध्ये तयार होताना दिसत आहे.
आमिर खानने मेकअपच्या मदतीने हा लूक केला आहे. आता हा त्याचा कोणता नवा प्रोजेक्ट आहे? असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. मात्र, त्याचा खुलासा अद्याप झालेला नाही. त्याचवेळी आमिरला या अवस्थेत पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. जर कुणी सांगितले नाही, तर आमिर खानला कोणी ओळखू शकत नाही. पण, त्याचा हा मेकअप आणि गेटअप इतका अप्रतिम आहे, की हा एखाद्या चित्रपटासाठी असेल तर नक्कीच धमाल करेल. आता या प्रकल्पाबाबत त्याच्या चाहत्यांमध्येही उत्सुकताही वाढली आहे.
संबंधित बातम्या