मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ चित्रपटातून मिळणारा नफा मराठा समाजाच्या मदतीसाठी! निर्मात्यांनी केली मोठी घोषणा

‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ चित्रपटातून मिळणारा नफा मराठा समाजाच्या मदतीसाठी! निर्मात्यांनी केली मोठी घोषणा

Jun 19, 2024 10:10 AM IST

‘संघर्षयोद्धा: मनोज जरांगे पाटील’ या चित्रपटाचा १०० टक्के नफा मराठा समाजाला जाहीर केला आहे. निर्मात्यांनी ही मोठी घोषणा करत सगळ्यांनाच एक आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे.

संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ चित्रपटातून मिळणारा नफा मराठा समाजाच्या मदतीसाठी!
संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ चित्रपटातून मिळणारा नफा मराठा समाजाच्या मदतीसाठी!

गेल्या काही दिवसांपासून राज्यभर प्रचंड चर्चेत असलेला आणि १४ जूनपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला ‘संघर्षयोद्धा: मनोज जरांगे पाटील’ या चित्रपटाच्या टीमने नुकतीच छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषद घेऊन ‘संघर्षयोद्धा: मनोज जरांगे पाटील’ या चित्रपटाचा १०० टक्के नफा मराठा समाजाला जाहीर केला आहे. निर्मात्यांनी ही मोठी घोषणा करत सगळ्यांनाच एक आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे.

मला आनंद वाटतोय की, एक खरा संघर्ष माझ्या लेखणीमधून आणि निर्मितीमधून राज्यातील लोकांच्या पुढे येतोय, असं निर्माते गोवर्धन दोलताडे म्हणाले. पुढे ते म्हणाले की, ‘या चित्रपटातून एक रुपया देखील कमवणे हा माझा हेतू नाही. उलट मला आनंद होईल की, या चित्रपटाचा जेवढा जास्तीत जास्त व्यवसाय होईल, तो सर्व समाजाला मदत म्हणून जाहीर करतोय. सर्वांनी जरांगे पाटील यांचा संघर्ष पुढे यावा आणि ह्या लढ्याला अजून ताकद मिळावी या अनुषंगाने महाराष्ट्रामधील लोकांनी करोडो संख्येने संघर्षयोद्धा चित्रपट पहावा. त्याचबरोबर या चित्रपटातून कोणाच्या भावना दुखावणार नाहीत, याची काळजी आम्ही घेतली आहे. पण, तरी देखील जर काही लोकांच्या भावना दुखावल्या असतील, तर मी निर्माता म्हणून सर्वांची जाहीर दिलगिरी व्यक्त करतो.’

उरलेयत अवघे २ दिवस! ‘बिग बॉस ओटीटी ३’चे सुत्रसंचालन करण्यासाठी अनिल कपूर आतुर! म्हणाले…

चित्रपटामुळे एक खरा संघर्ष पुढे येईल!

‘संघर्षयोद्धा: मनोज जरांगे पाटील’ हा चित्रपट राज्यभर हाऊसफुल होतोय. भरभरून शो वाढत आहेत आणि प्रेक्षकांकडून चित्रपटाची जास्त प्रमाणात मागणी देखील होत आहे, असं दिग्दर्शक शिवाजी दोलताडे म्हणाले. ‘संघर्षयोद्धा: मनोज जरांगे पाटील’ हा चित्रपट मराठी चित्रपट सृष्टीमधील सर्व रेकॉर्ड ब्रेक करेल, असं वाटत आहे. त्याचं बरोबर या चित्रपटाला मनोज जरांगे पाटील यांच्या शुभेच्छा आणि त्यांचे आशीर्वाद आमच्या बरोबर आहेत. या चित्रपटामुळे एक खरा संघर्ष पुढे येईल, यांच गोष्टीसाठी हा चित्रपट बनवलेला आहे, असं मत अभिनेता रोहन पाटील याने व्यक्त केलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

चित्रपटाचा संपूर्ण नफा मराठा समाजासाठी!

‘संघर्षयोद्धा: मनोज जरांगे पाटील’ या चित्रपटाच्या टीमने नुकतीच छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी पत्रकार परिषदेला सह निर्माते रामदास एकनाथ मेदगे, जान्हवी मनोज तांबे, विठ्ठल अर्जुन पचपिंड, नितीन लोहोकरे आणि चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. चित्रपटाचा संपूर्ण नफा मराठा समाजासाठी जाहीर केला जातोय, हा खूप धडाडीचा निर्णय वाटतो. त्यामुळे चित्रपटाची जास्तच चर्चा वाढत चालली आहे, असं दिसत आहे.

WhatsApp channel