डॉक्टरने केलं होतं अभिनेत्याचं लैंगिक शोषण! ‘अनुपमा’ या प्रसिद्ध मालिकेतील कलाकाराचा धक्कादायक खुलासा
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  डॉक्टरने केलं होतं अभिनेत्याचं लैंगिक शोषण! ‘अनुपमा’ या प्रसिद्ध मालिकेतील कलाकाराचा धक्कादायक खुलासा

डॉक्टरने केलं होतं अभिनेत्याचं लैंगिक शोषण! ‘अनुपमा’ या प्रसिद्ध मालिकेतील कलाकाराचा धक्कादायक खुलासा

May 27, 2024 07:39 AM IST

कलाकार अनेकदा कास्टिंग काउचबद्दल धक्कादायक खुलासे करतात. दरम्यान, एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याने आपल्या कास्टिंग काउचचा प्रसंग सांगून चाहत्यांना धक्का दिला आहे.

डॉक्टरने केलं होतं अभिनेत्याचं लैंगिक शोषण!
डॉक्टरने केलं होतं अभिनेत्याचं लैंगिक शोषण!

फिल्म इंडस्ट्री असो किंवा टीव्ही इंडस्ट्री… कलाकार अनेकदा कास्टिंग काउचबद्दल धक्कादायक खुलासे करतात. दरम्यान, एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याने आपल्या कास्टिंग काउचचा प्रसंग सांगून चाहत्यांना धक्का दिला आहे. हा अभिनेता दुसरा कोणी नसून 'अनुपमा' या लोकप्रिय टीव्ही शोचा ‘वनराज’ म्हणजेच अभिनेता सुधांशू पांडे आहे. अभिनेत्य सुधांशू पांडे या शोमध्ये वनराज शाहची भूमिका साकारून घराघरात लोकप्रिय झाला आहे. अलीकडेच सुधांशूने एका मुलाखतीत त्याच्यासोबत घडलेल्या कास्टिंग काउचचा खुलासा केला. अभिनेता म्हणाला की, तो लहान असतानाच त्याला अशा कृत्याचे बळी व्हावे लागले होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुधांशू पांडे म्हणाला की, फक्त मुलींचंच कास्टिंग काउच होतं असं नाही. अनेक वेळा मुलांनाही त्याचं बळी व्हावं लागतं. असाच काहीसा प्रकार त्याच्यासोबतही घडला होता. मुलाखतीत अभिनेता म्हणाला, 'इंडस्ट्रीमध्ये स्टार्सकडून कोणत्याही परिस्थितीत ॲडजस्ट करणे अपेक्षित असते. इथे एक अतिशय प्रसिद्ध म्हण आहे की काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावे लागते. परंतु माझा या म्हणीवर अजिबात विश्वास नाही. मलाही कास्टिंग काउचचा बळी व्हावे लागले होते.

कोण आहे संजय लीला भन्साली यांची बहिण बेला सेहगल आणि शर्मिनची आई? वाचा

१२ वर्षांचा असताना घडली वाईट घटना!

आपल्या आयुष्यातील या सर्वात वाईट क्षणाची आठवण करून देताना सुधांशू पांडे म्हणाला, 'मी फक्त १२ वर्षांचा होतो, तेव्हा मला लैंगिक छळाचा सामना करावा लागला.' अभिनेत्याने ही घटना सांगिताना म्हटले की, 'मी एका फॅमिली फ्रेंडच्या लग्नाला गेलो होतो, तिथे मी एका डॉक्टरला भेटलो. अल्पावधीतच माझी त्या डॉक्टरांशी छान ओळख झाली. काही वेळाने त्या डॉक्टरने मला वाईट हेतूने खोलीत बोलावून माझ्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. पण, मला त्याचा घाणेरडा हेतू लक्षात आला आणि मी तेथून पळ काढला. नंतर मी ही घटना माझ्या आईला सांगितली.’

त्याने तडजोड करण्यास सांगितले अन्...

अभिनेत्याने पुढे सांगितले की, इंडस्ट्रीत आल्यानंतरही एका प्रसिद्ध दिग्दर्शकाने त्याला तडजोड करण्याचा पर्याय दिला होता, परंतु अभिनेत्याने तसे करण्यास स्पष्टपणे नकार दिला होता. सुधांशू म्हणाला, 'या घटनांमुळे मी खूप खंबीर झालो आहे. आता मी अशा लोकांच्या फंदात पडत नाही. जर, कोणी तडजोड करण्यास सांगितले तर मी स्पष्टपणे नकार देतो. सुधांशू पांडेला 'अनुपमा' मधून खूप प्रसिद्धी मिळाली आहे. या मालिकेमधील त्याचे पात्र लोकांना खूप आवडते आहे.

Whats_app_banner