मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हरमधला वाद आजही जैसे थे? विमानातील फोटो शेअर करत म्हणाले...

कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हरमधला वाद आजही जैसे थे? विमानातील फोटो शेअर करत म्हणाले...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 08, 2024 09:03 AM IST

गेल्या ६ वर्षांपासून सुरू असलेले वैर विसरून हे दोन्ही विनोदी कलाकार ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मुळे पुन्हा एकत्र आले आहेत. पण या दरम्यान, आता कपिलची पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हरमधला वाद आजही जैसे थे? विमानातील फोटो शेअर करत म्हणाले...
कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हरमधला वाद आजही जैसे थे? विमानातील फोटो शेअर करत म्हणाले...

कॉमेडी किंग आणि अभिनेता कपिल शर्मा सध्या त्याच्या नव्याकोऱ्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो’मुळे चांगलाच चर्चेत आला आहे. यावेळी कपिलचा शो टीव्हीवर नाही, तर ३० मार्चपासून ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रसारित होत आहे. आत्तापर्यंत या शोचे दोन भाग आले आहेत. पहिल्या एपिसोडमध्ये रणबीर कपूर, नीतू कपूर आणि रिद्धिमा कपूर साहनी हे कुटुंब पाहुणे म्हणून आले होते. तर, दुसऱ्या भागात क्रिकेट जगतातील दोन महान खेळाडू म्हणजे क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी हजेरी लावली होती. ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा’चे हे दोन्ही भाग खूपच मजेशीर होते. यावेळी कपिलचा शो अनेक कारणांमुळे खूप खास आहे. यातील एक कारण म्हणजे सहा वर्षांनंतर प्रेक्षकांना कॉमेडियन सुनील ग्रोव्हर आणि कपिल शर्मा ही जोडी सोबत पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली आहे. मात्र, त्यांच्यातील वाद अद्याप शमले नसल्याचे म्हटले जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

गेल्या ६ वर्षांपासून सुरू असलेले वैर विसरून हे दोन्ही विनोदी कलाकार ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मुळे पुन्हा एकत्र आले आहेत. पण या दरम्यान, आता कपिलची पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टमध्ये कपिल पुन्हा एकदा सुनीलवर ताशेरे ओढताना दिसला आहे.

जुन्या भांडणावरून टोमणे

अभिनेता कपिल शर्मा याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये कपिल आणि सुनील विमानामध्ये बसलेले दिसत आहेत. यादरम्यान दोघेही खूप आनंदी दिसत आहेत. त्याच्या ट्रॅव्हल लूकबद्दल बोलायचे झाले तर कपिलने नियॉन रंगाचा हुडी आणि काळी पँट घातली आहे. तर, सुनीलने निळी डेनिम जीन्स आणि पांढऱ्या टी-शर्टसह क्रीम रंगाचे जॅकेट घातले आहे. दोघेही हाताने आपण विमानात असल्याचा इशारा करत आहेत. दोघांच्यामध्ये ज्यूसचा ग्लास ठेवला आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करताना कपिलने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'डोन्ट वरी फ्रेंड्स, ही एक छोटी फ्लाईट आहे.' जुन्या भांडणावरून आजही ही जोडी एकमेकांना टोमणे देताना दिसत आहे.

नेटकऱ्यांच्या कमेंट्सचा पाऊस

कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हरचा हा फोटो चाहत्यांमध्ये खूप चर्चेत आहे. यावर आता युजर्स कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. अनेक युजर्सनी या दोन्ही स्टार्सना एकत्र पाहिल्यानंतर त्यांच्या जोडीचे कौतुक केले आहे. तर, अनेकांनी कपिलचे कॅप्शन पाहून त्यावर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, 'हॅव अ सेफ फ्लाइट, अँड सेफ फाईट’. दुसऱ्या एकाने लिहिले की, 'भाऊ, यावेळी बूट काढ आणि जा.' अनेक सेलिब्रिटींनीही कपिलच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देत त्याचे कौतुक केले.

IPL_Entry_Point

विभाग