अभिनेत्री जुई गडकरी मुख्य भूमिकेत असलेली स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ठरलं तर मग' ही मालिका सुरुवातीपासून चर्चेत आहे. आता मालिकेत लवकरच सायली आणि अर्जुनचा विवाहसोहळा पाहायला मिळणार आहे. मालिकेच्या पहिल्या प्रोमोपासून सायली ज्या मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी धडपडतेय तो निर्णायक क्षण मालिकेत आला आहे.
आई-वडिलांचं छत्र हरवलेल्या सायलीला मधुभाऊंनी वडिलांच्या मायेने वाढवलं. मात्र अनाथ आश्रमाची जागा बळकावण्यासाठी त्यांना न केलेल्या खुनाच्या आरोपाखाली अटक झालीय. यातून त्यांची सुटका व्हावी यासाठी सायलीचे प्रयत्न सुरु आहेत.
वाचा: 'या' अभिनेत्रींशी जोडण्यात आले होते सिद्धार्थ मल्होत्राचे नाव, आता करतोय कियारा अडवाणीशी लग्न
मधुभाऊंच्या बाजूने कोर्टात लढण्यासाठी अर्जुनने कॉण्ट्रॅक्ट मॅरेजचा पर्याय सायलीसमोर ठेवला आहे. या लग्नासाठी सायली मनापासून तयार नाही. मात्र परिस्थितीसमोर हतबल होत तिने अर्जुनने दिलेला पर्याय स्वीकारण्याचं ठरवलं आहे. अर्जुन आणि सायली विवाहबंधनात अडकणार आहेत. कॉण्ट्रॅक्ट मॅरेज जरी असलं तरी मंदिरात देवाच्या साक्षीने आणि आशीर्वादाने दोघांचीही लगीनगाठ बांधली गेली आहे. या लग्नानंतर खरतर दोघांच्याही आयुष्यात नवं वळण येणार आहे. मालिकेतलं हे वळण नक्कीच उत्कंठावर्धक असेल. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये आगामी भागाची उत्सुकता लागली आहे.