Tharla Tar Mag Latest Episode 5 September 2023: ‘ठरलं तर मग’ या मालिकेत आता सायली आणि अर्जुन यांच्यात आता प्रेम फुलताना दिसणार आहे. सायली आणि अर्जुन यांचं लग्न एका विचित्र अटीमुळे झालं असलं तरी आता त्यांच्यात छान मैत्री निर्माण झाली आहे. लवकरच दोघांच्या नात्याला एक नवं वळण मिळणार आहे. मात्र, आता तरी दोघांमधील प्रेमाची जाणीव त्यांना होईल की नाही, हे लवकरच कळणार आहे. या सगळ्यात सायली आता अर्जुनला सगळ्या वाईट प्रवृत्तींपासून दूर ठेवणार आहे. प्रियाला देखील ती खडसावून सांगणार आहे.
सायली ही एका अनाथ आश्रमात लहानाची मोठी झाली आहे. मात्र, तिच्या याच आश्रमावर बिल्डरचा डोळा असतो. यातूनच या आश्रमात एक खून होतो. मात्र, या सगळ्या खुनाचा आरोप इथल्या मुलांचा सांभाळ करणाऱ्या मधु भाऊंवर लावला जातो. यानंतर पोलीस मधु भाऊंना पकडून घेऊन जातात. तर, आता मधु भाऊंना या संकटातून बाहेर काढण्यासाठी सायलीने अर्जुनची मदत मागितली होती. तर, अर्जुनने मधु भाऊंना यातून सुखरूप बाहेर काढण्यासाठी आणि मदत करण्यासाठी एक अट ठेवली. या अटीनुसार सायलीला अर्जुनशी लग्न करावे लागणार होते. मधु भाऊंना सोडवण्यासाठी सायलीने लग्न गाठ देखील बांधली.
मात्र, प्रिया अजूनही अर्जुनशी लग्नाचं स्वप्न उराशी बाळगून बसली आहे. यासाठी ती खूप प्रयत्न करत आहे. सायलीला अर्जुनच्या आयुष्यातून दूर करण्यासाठी प्रिया वेगवेगळे डाव रचत आहे. या दरम्यान ती अर्जुनशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न देखील करत आहे. तिचा हाच डाव आता सायलीच्या लक्षात आला आहे. तर, आता सायली प्रियाला अर्जुनपासून दूर राहण्यासाठी खडसावणार आहे. माझ्या नवऱ्यापासून दूर राहायचं, असं म्हणून ती प्रियाला धमकीवजा इशारा देणार आहे.
दुसरीकडे, अर्जुनच्या मनात देखील सायलीविषयी प्रेम निर्माण होऊ लागले आहे. मात्र, तो आपल्या मनातील भावना व्यक्त करायला धजावत आहे. तर, आता सायली देखील हळूहळू अर्जुनच्या प्रेमात पडू लागली आहे. लवकरच मालिकेत हा रोमँटिक ट्रॅक पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या