आपल्या दमदार अभिनयाने अभिनेत्री जुई गडकरी हिने सगळ्या प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. सध्या जुई गडकरी हिची ‘ठरलं तर मग’ ही मालिका छोट्या पडद्यावर चांगलीच गाजत आहेत. या मालिकेत जुईने ‘सायली सुभेदार’ ही भूमिका साकारली आहे. या आधी देखील जुईने अनेक मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती. तिच्या ‘पुढचं पाऊल’ या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी जुई नेहमीच प्रयत्नशील असते. आज ८ जुलै रोजी जुईचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी...
जुई ही मूळची रायगडमधील कर्जतची आहे. तिचे बालपण तेथेच गेले आहे. तिने उल्हासनगरमधील सीएचएम कॉलेजमधून पदवीधर शिक्षण घेतले. त्यानंतर तिने एका जाहिरातीमध्ये काम करत अभिनयांच्या प्रवासाला सुरुवात केली. ‘पुढचं पाऊल’ ही तिची पहिली मालिका. या पहिल्याच मालिकेतून तिने प्रेक्षकांची मने जिंकली.
जुई गडकरीने काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये तिला ‘तुम्हाला लग्नाच्या पंगतीमध्ये जेवायला आवडेल की लोकांना जेवण वाढायला आवडेल?’ असा प्रश्न या दोघांना विचारण्यात आला होता. त्यावर जुईने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले. तिने तिच्या आयुष्यात घडलेला एक किस्सा सांगितला आहे.
वाचा: अनंत अंबानीच्या संगीत सोहळ्यात सलमान खानचा स्वॅग, पाहा व्हिडीओ
जेवायला वाढायला आवडेल की, जेवायला आवडेल या प्रश्नावर उत्तर देताना जुई म्हणाली की, ‘मला तर लग्नाचं जेवण जेवायला प्रचंड आवडतं. लग्नात असलेला मसालेभात मला इतका आवडतो की, मी त्यासाठी एखादं दिवस उपवास करून देखील जेवायला जाऊ शकते. लग्न जर पुण्यात असेल आणि तिथल्या एखाद्या पारंपरिक मंगल कार्यालयात असेल, तर त्या लग्नातील जेवणाची चवच निराळी असते.'
वाचा: कालीन भैय्या सर्वात महाग! 'मिर्झापूर'साठी कोणत्या कलाकाराने किती मानधन घेतले?
पुढे जुई म्हणाली, 'असंच एकदा एका लग्नात जेवत असताना मला अक्षरशः बसल्या जागी येऊन सांगण्यात आलं की, मॅडम आता जेवण संपलं आहे. सगळ्यांची जेवणं उरकली आहेत. पंगतही उठली आहे, तेव्हा आता तुम्हीही उठा. अर्थात त्यादिवशी मी उपवास करून मसालेभात खाण्यासाठी लग्नात पोहोचले होते. पिवळी बटाट्याची भाजी, पुरी, जिलेबी, मसालेभात हे पारंपारिक पदार्थ मला प्रचंड आवडतात. त्यामुळे मी पंगतीत बसून जेवू शकते, जेवणं वाढण्याचं काम देखील मी नक्की करेन.’
वाचा: अशोक सराफ आणि माधव अभ्यंकरची होणार टक्कर, 'लाईफलाईन' सिनेमातील अण्णांचा लूक व्हायरल
संबंधित बातम्या