सध्या मराठी मालिका विश्वामधील सर्वात लोकप्रिय आणि टीआरपी यादीमध्ये पहिले स्थान पटकावणारी मालिका म्हणजे 'ठरलं तर मग.' या मालिकेत अभिनेत्री जुई गडकरी महत्त्वाच्या भूमिकेत दिसत असून तिने जवळपास ५ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे. मालिकेतील जुईची सायली ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे. ज्या प्रमाणे सायली विषयी चर्चा रंगलेली असते त्याच प्रमाणे जुईच्या खासगी विषयावर देखील अनेक चर्चा सुरु असतात. सध्या जुई तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आहे.
जुई ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. नुकताच तिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये जुईला एका व्यक्तीने तुरुंगात टाकण्याची धमकी दिल्याचे दिसत आहे. पण हे पाहून जुई देखील शांत बसली नाही. तिने त्या व्यक्तीला जशास तसे उत्तर देत सुनावले आहे. जुईची ही पोस्ट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
वाचा: सलूनच्या बाहेर स्वत:चा फोटो पाहून संतोष जुवेकरने केली मेजशीर पोस्ट, म्हणाला 'अपून तो हिरो बनगया!'
जुईला एका चाहतीने मेसेज केला होता. या मेजेसमध्ये तिने 'काय गं तुला खूप माज आलाय का? आम्ही तुला फॉलो करायचे आणि तुला आम्हाला फॉलो करायला काय झाले? आताच्या आता आम्हाला फॉलो करायचे... तू फॉलो कर नाहीतर तुला जेलमध्ये टाकेन. आजपर्यंत तू आमची आवडती होतीस. कारण, आम्हाला वाटले तू फॉलो करशील. पण, तू फॉलो केले नाहीस. आता तुला पोलिसात टाकेन… मी उद्याच्या उद्या तुझ्या गावाला येते कर्जतला समजले कुठेही पळायचे नाहीस' असे म्हटले आहे. या मेसेजचा स्क्रीनशॉट जुईने इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर केला आहे.
वाचा: बायकोचं सामान उचलून कुशल बद्रिके निघाला फिरायला, मजेशीर फोटो शेअर करत म्हणाला...
जुईने हा स्क्रीनशॉट शेअर करत संबंधीत चाहतीला टॅग केला आहे. तसेच 'आता झालीस तू फेमस... येच तू कर्जतला बघते मी पण... हे वागणे अजिबात सहन केले जाणार नाही. आपण थेट पोलीस ठाण्यात भेटूया' असे जुईने म्हटले आहे. सध्या सोशल मीडियावर जुईच्या या पोस्टची जोरदार चर्चा रंगली आहे.
वाचा: अभिनेत्री समांथा रुथ प्रभूचे खरे नाव माहिती आहे का? तिच्या वाढदिवशी चला जाणून घेऊया..