टीआरपी यादीमध्ये पहिले स्थान पटकावणारी सध्याची लोकप्रिय मालिका म्हणजे 'ठरलं तर मग.' या मालिकेत अभिनेत्री जुई गडकरी महत्त्वाची भूमिका साकारताना दिसत आहे. या मालिकेतून जुईने बऱ्याच वर्षानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. पण जुईची प्रकृती ही गेल्या काही महिन्यांपासून ठीक नसल्याचे समोर आले होते. आता जुई रुग्णालयात दाखल असल्याचे स्पष्ट झाले आहे. तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
जुई ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिने नुकताच तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती रुग्णालयात उपचार घेत असल्याचे दिसत आहे. तसेच जुई बेडवर झोपली असून तिच्या हाताला आयव्ही लावेली दिसत आहे. या फोटोवर जुईने 'आज आयव्ही काढली, डिस्चार्ज मिळाला.. नेमकं काय झालं हे लवकरच सांगते' असे लिहिले आहे. प्रकृती स्थिर असल्याने आज जुईला घरी सोडण्यातही येणार आहे. लवकर जुईच्या तब्येतीबाबतची अपडेट समोर येईल. सध्या सोशल मीडियावर जुईचा हा फोटो तुफान व्हायरल झाला असून चाहते काळजी करताना दिसत आहेत.
काही वर्षांपूर्वी जुई गडकरी मोठ्या आजाराशी झुंज देत होती. त्यामुळे तिने इंडस्ट्रीमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. जवळपास ५ ते ६ वर्षे जुई इंडस्ट्रीपासून लांब होती. तिची स्टार प्रवाह वाहिनीवर पुढचं पाऊल ही त्यावेळी लोकप्रिय ठरलेली मालिका होती. पहिल्याच मालिकेने जुईला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवले होते. २०१७ नंतर आता जुई पुन्हा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी पोहोचली आहे. चाहते देखील तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत असल्याचे दिसत आहे.
वाचा: पुढच्या वर्षी अभिनेत्री सायली संजीव करणार लग्न? रक्षाबंधनानिमित्त शेअर केलेल्या व्हिडीओची चर्चा
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतून अवघ्या महाराष्ट्रात लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. सध्या ती ‘ठरलं तर मग’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत ती सायली हे पात्र साकारत असून तिची ही भूमिका अनेकांच्या पसंतीस उतरत आहे, आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी ही अभिनेत्री सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. गेल्या काही दिवसांपासून जुई आजारी आहे. आता जुईला रुग्णालयात का दाखल करण्यात आले याविषयी चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे.