मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tharala Tar Mag 18th Mar: सायलीला अर्जुनपासून दूर करण्याचा नवा डाव; महिपत आणि साक्षी खेळणार नवी चाल

Tharala Tar Mag 18th Mar: सायलीला अर्जुनपासून दूर करण्याचा नवा डाव; महिपत आणि साक्षी खेळणार नवी चाल

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 18, 2024 11:20 AM IST

Tharla Tar Mag 18 March 2024 Serial Update: बेलपानं आणण्यासाठी बाहेर पडलेली सायली अजूनही घरी परतलेली नाही. त्यामुळे सुभेदार कुटुंबातील काही लोक सायलीच्या काळजीत दाराशी बसून आहेत.

सायलीला अर्जुनपासून दूर करण्याचा नवा डाव
सायलीला अर्जुनपासून दूर करण्याचा नवा डाव

Tharla Tar Mag 18 March 2024 Serial Update: ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागामध्ये एक वेगळाच थरार पाहायला मिळणार आहे. बेलपानं आणण्यासाठी बाहेर पडलेली सायली अजूनही घरी परतलेली नाही. त्यामुळे सुभेदार कुटुंबातील काही लोक सायलीच्या काळजीत दाराशी बसून आहेत. तर, काहींना मात्र सायली घरी परत आली नसल्याने फारच आनंद झाला आहे. प्रताप, पूर्णा आजी आणि अस्मिता यांना सायली घरी नसल्यामुळे आनंद होत आहे. दुसरीकडे, कल्पना आणि अश्विन मात्र सायलीच्या वाटेकडे डोळे लावून राहिले आहेत. तर, अर्जुन सायलीच्या आठवणीने पुरता व्याकुळ झाला आहे. सायली नेमकी कुठे गेली असावी? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

या सगळ्या परिस्थितीमध्ये प्रिया आता स्वतःचा संधी साधूपणा करत पूर्णा आजी, प्रताप आणि अस्मिता यांची मनं जिंकून घेत आहे. संतोष सायलीला महिपत विरोधात सगळे पुरावे देत असताना साक्षीनं त्या दोघांना पाहिलं होतं. सायलीकडे आपल्या आणि महिपत विरोधात पुरावे असल्याचे लक्षात येतात, तिने सायलीला किडनॅप करण्याचा प्लॅन आखला होता. या प्लॅनप्रमाणे साक्षीनं सायलीला किडनॅप केलं आहे. मात्र, साक्षीची ही कृती महिपतला आवडलेली नाही. त्यामुळे महिपत सगळ्यांसमोरच साक्षीला सुनावणार आहे. सायलीला किडनॅप केलं, तर तिथल्या तिथे मारून टाकायचं होतं, अडकवून का ठेवलं? असा प्रश्न महिपत साक्षीला करणार आहे.

Viral Video: इंटरनेटवर सुहानाचीच हवा... शाहरुख खानच्या लेकीनं शेअर केला बाथटबमध्ये अंघोळ करतानाचा व्हिडीओ!

सायलीला मारू नका; नागराजचा सल्ला!

‘साक्षी तू अर्धवट सोडलेलं काम आता मला पूर्ण करावं लागणार’, असं म्हणत महिपत सायलीला जीवे मारण्याची तयारी करत होता. मात्र, नागराजने या सगळ्यात मध्ये पडत सायलीला मारून टाकू नका, असं दोघांना सुचवलं आहे. ‘सायली मेली, तर खोटी तन्वी बनवून घरात वावरत असलेली प्रिया आपल्या डोक्यावर बसेल आणि आपल्याकडून सगळा पैसा उकळेल, तसंच दादाची सगळे प्रॉपर्टी देखील स्वतःच्या नावावर करून घेईल. त्यामुळे तुम्ही खऱ्या तन्वीला म्हणजेच सायलीला मारू नका’, असं नागराज दोघांना समजावणार आहे.

प्रियाच्या आनंदाला उधाण!

दुसरीकडे, सुभेदारांच्या घरात असलेली प्रिया स्वतःच्या मनात वेगवेगळी चित्र तयार करून, आनंदी होत आहे. सायली घरात परत आलीच नाही, तर अर्जुनच्या आयुष्यात येण्याचा आपला मार्ग मोकळा होणार आहे, असं प्रियाला वाटत आहे. त्यामुळे ती मनातून आनंदून गेली आहे. तर, अर्जुनच्या आयुष्यात आपलं स्थान पक्कं होईल, शिवाय साक्षीकडून मिळणाऱ्या पैसा यामुळे आपण मालामाल होऊ आणि आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील, असे प्रियाला वाटत आहे. सायली गायब झाल्यानंतर आता प्रिया साक्षीला फोन करून, तिच्याकडे पैशाची मागणी करणार आहे. नागराज काही वेळापूर्वीच बोललेली गोष्ट इतक्यातच खरी झाल्याचे दिसल्याने, आता महिपत आणि साक्षी सायलीला मारण्याचा प्लॅन कॅन्सल करणार आहेत.

Neena Kulkarni Serial: छोट्या पडद्यावर पुन्हा एका नव्या मालिकेची एंट्री! नीना कुळकर्णींचं धमाकेदार कमबॅक

किडनॅप करून ठेवलेल्या सायलीचं नक्की करायचं तरी काय असा प्रश्न दोघांपुढे असताना, आता ते एक नवा डावा आखणार आहे. सायलीला अर्जुनपासून दूर ठेवण्यासाठी थेट राजस्थानमध्ये सोडून येण्याचा निर्णय महिपतने घेतला आहे. दुसरीकडे, अर्जुन आणि सायली एकमेकांच्या आठवणीत व्याकुळ झालेले पाहायला मिळणार आहेत. आता अर्जुन आपल्या पत्नीला म्हणजे सायलीला शोधू शकेल का आणि तिला या संकटातून वाचवू शकेल का? हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

IPL_Entry_Point