मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  अर्जुनच्या ‘त्या’ बोलण्याने सायली सुखावणार! ‘ठरलं तर मग’ मालिकेमध्ये आता रोमँटिक वळण येणार

अर्जुनच्या ‘त्या’ बोलण्याने सायली सुखावणार! ‘ठरलं तर मग’ मालिकेमध्ये आता रोमँटिक वळण येणार

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 16, 2024 03:59 PM IST

‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात अस्मिता पुन्हा एकदा सायलीला डिवचायचा प्रयत्न करताना पाहायला मिळणार आहे.

अर्जुनच्या ‘त्या’ बोलण्याने सायली सुखावणार! ‘ठरलं तर मग’ मालिकेमध्ये आता रोमँटिक वळण येणार
अर्जुनच्या ‘त्या’ बोलण्याने सायली सुखावणार! ‘ठरलं तर मग’ मालिकेमध्ये आता रोमँटिक वळण येणार

ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात प्रेक्षकांना पुन्हा एकदा अर्जुन आणि सायलीच्या नात्यातील गोडवा पाहायला मिळणार आहे. आजच्या भागात अस्मिता पुन्हा एकदा सायलीला डिवचायचा प्रयत्न करताना पाहायला मिळणार आहे. या आधी देखील अस्मिताने सायलीला मुद्दाम त्रास देण्याचा प्रयत्न केला. मात्र, अर्जुनने तिला चांगलंच खडसावलं आहे. मात्र, इतकं होऊनही अस्मिता पुन्हा सायलीला त्रास देण्याचा प्रयत्न करणार आहे. आता ती सायलीला तिच्या साध्या स्वभावावरून बोलणार आहे. मात्र, आता पुन्हा एकदा अर्जुन आपल्या बायकोची बाजू घेण्यासाठी सज्ज होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अर्जुनच्या मित्रांनी नुकतंच एक रियुनियन प्लॅन केलं आहे. या रियुनियनमध्ये अर्जुन देखील मित्रांना भेटायला जाणार आहे. यावेळी अर्जुन सायलीला घेऊन जाणार का? असा खोचक प्रश्न अस्मिताने केला होता. यावर अर्जुनने तिला चांगलेच बोल सुनावले होते. ‘ही सायली त्या शिकलेल्या वकिलांमध्ये जाऊन काय बोलणार? ते सगळे वकील चर्चा करत असतील. त्यांच्यात हिला काय बोलायला जमणार आहे? आणि हिला त्यांच्याशी बोलता येत नाही, हे बघून सगळ्यांना कळणार की अर्जुनची बायको ही त्याला मॅचिंग नाही. सगळ्यांमध्ये त्यांचं हसं होईल.’ यावर अर्जुनने तिला खडसावत म्हटलं होतं की, ‘मॅचिंग करायला ते काही कपडे नाहीत. ती माझी बायको आहे आणि या नात्याने सायली माझ्यासोबत रियुनियन सोहळ्याला नक्की येणार, मी सायलीला माझ्यासोबतच घेऊन जाणार’. हे ऐकल्यानंतर अस्मिता गप्प झाली होती.

कर्ज फेडायला करावं लागत बाबा…! स्वतःचा व्हिडीओ शेअर करत प्राजक्ता माळी असं का म्हणाली?

अस्मिता देणार सायलीला त्रास

मात्र, याचाच बदला घेण्यासाठी आता अस्मिता अर्जुनच्या निघून गेल्यानंतर सायलीच्या खोलीत जाणार आहे. पुन्हा एकदा अस्मिता सायलीला त्रास देण्याचा प्रयत्न करणार आहे. यावेळी अस्मिता सायलीला विचारते की, तुला कॉन्टिनेन्टल जेवण माहिती आहे का? ते तुला खाता येतं का? यावर सायलीच्या चेहऱ्यावर वाजलेले बारा बघून अस्मिताच्या लक्षात येतं की, सायलीला याबद्दल काहीही कल्पना नाही. यानंतर ती या परिस्थितीचा फायदा घेऊन सायलीला म्हणते की, ‘याचा अर्थ तुला काहीच खाता येणार नाही. तू नुसतीच कटलरीकडे बघत बसणार आणि तुला या खाण्याबद्दल काहीच माहिती नाही, हे कळल्यानंतर अर्जुनला तुझी लाज वाटणार आहे.’ अस्मिताचे हे बोलणं जिव्हारी लागल्यामुळे सायलीच्या डोळ्यात पाणी येतं.

अर्जुन सायलीची समजूत घालणार

तितक्यात अर्जुन तिथे येऊन सायलीच्या डोळ्यातलं पाणी पाहून सायलीला काय झालं?, असं विचारतो. यानंतर सायली घडलाप्रकार अर्जुनला सांगते. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की, ‘मी असं कसं म्हणून शकेन की, मला तुमची लाज वाटते? हे कधीही शक्य होणार नाही. उलट मी इतका आनंदी आहे की, माझ्या सगळ्या मित्रांना कधी सांगतो की माझी बायको लाखात एक आहे, असं मला झालं आहे.’ यावेळी अर्जुनच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून सायली मनोमन सुखावून जाणार आहे. दोघांमध्ये आता हळूहळू प्रेम फुलताना दिसणार आहे.

IPL_Entry_Point