Tharala Tar Mag Tv Serial : छोट्या पडद्यावरच्या ‘ठरलं तर मग’ मालिकेमध्ये सायली आणि अर्जुन यांच्या रोमँटिक केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या शोमध्ये सायली आणि अर्जुन यांच्यातील प्रेम बहरत असून, दोघेही त्यांच्या प्रेमाची कबुली कधी देणार, हा प्रश्न अनेक महिने प्रेक्षकांच्या मनात होता. आता अखेर हा क्षण जवळ आला असून, शोच्या प्रोमोने साऱ्यांच्या उत्सुकतेला अजूनच वाव दिला आहे.
मालिकेतील प्रमुख पात्र असलेल्या सायली आणि अर्जुन यांच्यातील प्रेमाची गोष्ट सध्या रोमांचक वळणावर पोहोचली आहे. अर्जुन त्याच्या प्रेमाची कबुली सायलीला देणार असतानाची एक रोमँटिक सीन प्रोमोत दाखवण्यात आला आहे. या प्रोमो व्हिडिओमध्ये अर्जुन आणि सायली एकमेकांसमोर बसले आहेत आणि अर्जुन सायलीला सांगतो की, ‘मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे.’ त्याच वेळी, अर्जुन खिशातून अंगठी बाहेर काढतो आणि तो म्हणतो, ‘आय…’ आणि याच क्षणी प्रोमो संपतो. या प्रोमोत दोघांचे रोमँटिक संवाद प्रेक्षकांच्या मनाला भिडत आहेत. तर हा सीन प्रेक्षकांची आतुरता आता आणखी वाढवत आहे.
या मालिकेतील सायली म्हणजेच जुई गडकरी हिने या सीनचा व्हिडिओ शेअर केला आहे. मालिकेचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. शोच्या या एपिसोडच्या शूटिंगचा एक खास व्हिडिओ जुई गडकरीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. जुईने या व्हिडीओला ‘टीमवर्कने सगळ्या गोष्टी साध्य होतात. बहुप्रतिक्षीत प्रोमोचा BTS खास तुमच्यासाठी’ असे कॅप्शन दिले आहे. या व्हिडीओमध्ये जुईने शोच्या टीमवर्कचे कौतुक केले आहे.
प्रोमोत दिसणारा रोमँटिक सीन आणि व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांनी म्हटले आहे की, ‘जर का हा सीन स्वप्नातला असेल, तर काही खरं नाही’, ‘आम्ही खूप वाट पाहत आहोत की सायली आणि अर्जुन एकमेकांना प्रेम व्यक्त करतील. आता हाच सीन खऱ्या अर्थाने दाखवला पाहिजे.’ काही प्रेक्षकांनी जुई गडकरीच्या अभिनयाच्या कौशल्याचं आणि टीमवर्कचे विशेषत: कौतुक केलं आहे. एक नेटकरी म्हणतो, ‘जुई ताई खरच मानलं पाहिजे तुम्हाला. इतक्या गोंगाटात सुद्धा तुम्ही आपल्या भूमिकेत शांततेत आणि सहजपणे काम करत आहात. तुमच्या कामाच्या मागे किती मेहनत असते, हे सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसून येत आहे.’
प्रोमोत सायली आणि अर्जुन यांच्या प्रेमाच्या सुरूवातीचा हा टप्पा आणि ही रोमॅंंटिक दृश्य पाहून प्रेक्षक अधिकच उत्सुक झाले आहेत. ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या प्रेमकहाणीची पुढील दिशा काय असणार, हे पाहणं अत्यंत रोमांचक ठरणार आहे. एकीकडे सायली आणि अर्जुन यांची लव्हस्टोरी पुढे जाऊन एक सुंदर वळण घेईल का? यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या व्हिडीओने 'ठरलं तर मग' मालिकेच्या चाहत्यांची अपेक्षा आणखी वाढवली आहे. आता प्रेक्षकांचं लक्ष सायली आणि अर्जुनच्या प्रेमाची कबुली आणि त्यांच्या नात्याची पुढील टप्प्यांकडे लागून राहील आहे.