आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा गैरवापर कसा केला जाऊ शकतो याचे एक उदाहरण म्हणजे डीप फेक टेक्नॉलॉजी. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एखाद्या व्हिडीओमध्ये दुसऱ्या व्यक्तीचा हुबेहुब चेहरा आणि आवाज बदलण्याचा चमत्कार करता येतो. सर्वसामान्य माणसांना हे व्हिडीओ आणि फोटो खरे वाटू लागले आहेत. ‘एआय’चा अनेक क्षेत्रात सदुपयोग आहे, पण अनेकजण या तंत्रज्ञानाचा चुकीचा वापरही करताना दिसून येतात. अभिनेत्री जुई गडकरी या डीप फेक टेक्नॉलॉजीची शिकार झाली आहे. तिने सोशल मीडियावर याबाबत पोस्ट शेअर केली आहे.
‘ठरलं तर मग’ या मालिकेतून संपूर्ण महाराष्ट्राचे मनोरंजन करणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. जुई ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. नुकताच तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने एआय’ तंत्रज्ञानावर तिची नाराजी व्यक्त केली आहे. जुईच्या एका फोटोशूटचा गैरवापर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये जुई ऐवजी एका भलत्याच स्त्रीचा फोटो वापरण्यात आला आहे. ते पाहून जुई संतापली आहे.
जुईने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जुई गडकरीच्या जांभळ्या रंगाच्या साडीतील फोटोमध्ये एका वेगळ्या स्त्रीचा फोटो वापरण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने, “एआयचा गैरवापर. असे दुसऱ्याचे फोटो वापरणे चांगले नाही” असे म्हणत संताप व्यक्त केला आहे.
वाचा: परिस्थिती नसताना शेअर मार्केटमध्ये गुंतवले पैसे, 'स्कॅम १९९२'मधील अभिनेत्यासोबत खऱ्या आयुष्यात झाला स्कॅम
‘एआय’ तंत्रज्ञानाच्या गैरवापर करत अनेक अभिनेत्रींचे अश्लील व मॉर्फ केलेले फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले. रश्मिका मंदाना, कतरीना कैफ व आलिया भट्ट यासह अनेक अभिनेत्री डीपफेकला बळी पडल्या आहेत. त्यानंतर आता अभिनेत्री जुई गडकरीचा देखील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
संबंधित बातम्या