Tharala Tar Mag Latest Episode: ‘ठरलं तर मग’ या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून सायली आणि अर्जुन यांच्या लुटूपुटूचे वाद सुरू असलेले दिसले आहेत. अर्जुनच्या बोलण्यामुळे दुखावलेली सायली सुभेदारांचे घर सोडून आपल्या माहेरी निघून गेली होती. सायली अनाथ असली तरी तिच्या कुसुम ताईंचं घर हे तिचं हक्काचं माहेर आहे. आपल्या या घरी सायली अगदी कधीही जाऊ शकते. त्यामुळे अर्जुनवर नाराज झालेली सायली घर सोडून माहेरी निघून गेली होती. तर, दुसरीकडे अर्जुन सायली समोर न दिसल्याने अस्वस्थ झाला होता. मात्र, सायलीला आणायला गेलेल्या अर्जुनचा कुसुम ताईंसोबत जोरदार वाद झाला होता. आता या वादाचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
कुसुम ताईंचं सायलीशी रक्ताचं नातं नसलं, तरी त्यांनी सायलीला आईची माया दिली आहे. त्यामुळे त्या सायलीचा फार मायेने सांभाळ करतात. आपल्या पोटच्या मुलीप्रमाणे त्या सायलीवर प्रेम करतात. सायली रागावून माहेरी निघून आली आहे, ही गोष्ट कुसुम ताईंना आधीच माहित होती. त्यामुळे सायलीच्या जवळ येण्याचा प्रयत्न करणाऱ्या अर्जुनला त्या साय्लीपासून दूर ठेवत होत्या. अर्जुन सायलीला घेण्यासाठी थेट त्यांच्या घरी पोहोचला होता. मात्र, त्यावेळी कुसुम ताईंचा थोडासा गैरसमज झाला होता.
अर्जुनमुळे दुखावलेली सायली माहेर निघून आली आहे आणि आता आईच्या सांगण्यावरून अर्जुन इथे येऊन आता सायलीला पुन्हा घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय, असे कुसुम ताईंना वाटले. या सगळ्या गोष्टी सायलीच्या मनाविरुद्ध सुरू असल्यासारखे त्यांना वाटले. म्हणूनच त्यांनी अर्जुनला चांगलेच फैलावर घेतले होते. यावेळी कुसुम ताई आणि अर्जुनमध्ये तूतू-मैमै देखील झाली होती. दोघांमधील हा वाद पाहून सायली देखील हैराण झाली होती.
तर, कुसुम ताई आपल्याला चुकीचं समजत असल्यामुळे अर्जुन देखील त्यांच्यावर वैतागला होता. रागाच्या भरात अर्जुनने देखील त्यांच्याशी थोडासा वाद घातला. लांबून चैतन्य या सगळ्या गोष्टी बघत होता. मात्र, त्याला देखील अर्जुनला समजावता आले नाही. अर्जुनने यावेळी शांत बसावं, असं चैतन्यला वाटत होतं. मात्र, अर्जुनने आपल्या तोंडाचा पट्टा सुरूच ठेवला होता. दोघांमधील हा वाद मनोरंजक होता.