मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Jui Gadkari Post: ‘सत्याचाच विजय होणार!’; अभिनेत्री जुई गडकरीच्या पोस्टने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

Jui Gadkari Post: ‘सत्याचाच विजय होणार!’; अभिनेत्री जुई गडकरीच्या पोस्टने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 11, 2024 01:07 PM IST

Tharala Tar Mag Actress Jui Gadkari Post: सध्या जुई गडकरी हिची ‘ठरलं तर मग’ ही मालिका प्रचंड चर्चेत आहे. सध्या ही मालिका अतिशय निर्णायक वळणावर आली आहे.

Tharala Tar Mag Actress Jui Gadkari Post
Tharala Tar Mag Actress Jui Gadkari Post

Tharala Tar Mag Actress Jui Gadkari Post: ठरलं तर मग’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री जुई गडकरी सध्या सोशल मीडियावर देखील प्रचंड चर्चेत असते. सध्या जुई गडकरी हिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी तिचे चाहते देखील उत्सुक झालेले दिसतात. ‘पुढचं पाऊल’ मालिकेतील कल्याणी ते आता ‘ठरलं तर मग’मधील सायली... जुईच्या सगळ्याच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान मिळवलं आहे. आता सायली बनून देखील प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. ‘ठरलं तर मग’ मालिकेतील सायली सध्या तिच्या कुटुंबाचं प्रेम मिळवण्यासाठी धडपडताना दिसत आहे. यातच आता जुई गडकरी हिने एक अशी पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

गेल्या काही दिवसांपासून जुई गडकरी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आली आहे. कधी तिचं आजपण, तरी तिचं शिक्षण जुई गडकरी तिच्या प्रत्येक गोष्टीमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणारी जुई गडकरी दररोज काही ना काहीतरी नवीन शेअर करत असते. तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगते. सध्या जुई गडकरी हिची ‘ठरलं तर मग’ ही मालिका प्रचंड चर्चेत आहे. सध्या ही मालिका अतिशय निर्णायक वळणावर आली आहे. मधुभाऊंना सोडवण्यासाठी सायली आणि अर्जुन प्रचंड मेहनत करत आहेत.

Shaitaan Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर ‘शैतान’चा धुमाकूळ! अवघ्या ३ दिवसांत पार केला ५० कोटींचा टप्पा

मालिकेत सध्या काय सुरू आहे?

यातच आता चैतन्याने साथ सोडल्याने अर्जुन खचून गेला आहे. मात्र, या सगळ्यात सायली त्याची साथ देत आहे. सायली आणि अर्जुन आपल्याला घाबरत नाहीत, हे बघून महिपतने नवीन डाव टाकला होता. त्याने अर्जुनचे वडील प्रताप सुभेदार यांच्या गाडीत ड्रग्स ठेवून, या प्रकरणात त्यांना फसवलं होतं. मात्र, पोलिसांनी अटक केल्यानंतर प्रताप सुभेदारांना आपणच जामीन देऊन सोडवलं, असं नाटक त्याने रचलं. महिपत शिखरे याच्या डावात सुभेदार कुटुंब देखील फसलं. अर्जुन सायलीसाठी बाकीच्या सगळ्याच लोकांना डावलतोय, असा आरोप सुभेदार कुटुंबीयांनी त्याच्यावर केला. घरात घडत असलेल्या गोष्टींचे खापर आता पूर्णा आजीने सायलीवर फोडलं आहे.

काय म्हणाली जुई गडकरी?

गेले कित्येक दिवसांपासून सायली आणि अर्जुन ही सत्याची लढाई अतिशय जिगरीने लढत आहेत. जुई गडकरीने नुकतीच शेअर केलेली पोस्ट देखील याच संदर्भात असल्याचे म्हटले जात आहे. जुईने नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, ‘तुम्ही सगळे ज्या गोष्टीची वाट बघत होतात, ती गोष्ट आता लवकरच घडणार आहे. सत्याचाच विजय होणार! #ठरलं तर मग बघत रहा.’ तिच्या या पोस्टमुळे आता मालिकेत पुढे काय घडू शकतं, याची कल्पना चाहत्यांना आली आहे.

IPL_Entry_Point