मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tharala Tar Mag 9th Jan: सायलीचा रुसवा घालवण्यासाठी अर्जुन घेणार आता चिमुकल्यांची मदत! पुढे काय होणार?

Tharala Tar Mag 9th Jan: सायलीचा रुसवा घालवण्यासाठी अर्जुन घेणार आता चिमुकल्यांची मदत! पुढे काय होणार?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 09, 2024 07:21 PM IST

Tharala Tar Mag 9th January 2024 Serial Update: गेल्या काही दिवसांपासून रागावून दूर झालेल्या सायलीची समजूत काढण्यासाठी अर्जुन प्रयत्न करणार आहे.

Tharala Tar Mag 9th January 2024
Tharala Tar Mag 9th January 2024

Tharala Tar Mag 9th January 2024 Serial Update: रुसलेल्या सायलीची समजूत काढण्यासाठी आता अर्जुनने आपले सगळे प्रयत्न पणाला लावले आहेत. सायलीला घरी परत आणण्यासाठी अर्जुन आता तिची माफी मागणार आहे. यासाठी आता अर्जुन सगळे प्रयत्न करत आहे. सायलीला सॉरी म्हणण्यासाठी आता अर्जुन स्वतः तिच्या घरी पोहोचला आहे. मात्र, आपल्याला सायलीपर्यंत पोहोचता येत नसल्याने आता अर्जुन सायलीच्या चाळीतील लहान मुलांची मदत घेणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून रागावून दूर झालेल्या सायलीची समजूत काढण्यासाठी अर्जुन प्रयत्न करणार आहे. यासाठी आता अर्जुन सायलीची मनापासून माफी मागणार आहे. सायलीची समजूत काढण्यासाठी हातात ‘सॉरी’चा बोर्ड घेऊन अर्जुन सायलीकडे पोहोचणार आहे. सायली घरी परत यावी म्हणून अर्जुन आता काहीही करण्यासाठी तयार झाला आहे. आता रागावलेल्या सायलीचा रुसवा दूर होईल की, नाही हे पाहणं रंजक ठरणार आहे.

Rashid Khan : प्रख्यात शास्त्रीय गायक उस्ताद राशिद खान यांचं निधन; वयाच्या ५५व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

गेल्या काही दिवसांपासून अर्जुन सायलीचा भूतकाळ शोधून काढण्याचा प्रयत्न करत आहे. तो सायलीच्या आई-वडिलांचा शोध घेत आहे. अर्जुन आपला भूतकाळ शोधत आहे, याची सायलीला कल्पनाच नव्हती. सायलीला तिचं कुटुंब मिळावं यास्तही अर्जुन खूप मेहनत घेत आहे. अर्जुन या गोष्टी सायलीपासून लपवून करत होता. मात्र, आता हीच गोष्ट सायलीला कळली आहे. यामुळेच सायली अर्जुनवर रागावली. मात्र, तिला समजवण्याऐवजी अर्जुन तिच्यावर ओरडल्याने तिचा रुसवा आणखीनच वाढला होता. अर्जुनने सायलीला ‘तुम्ही माझ्याशी बोलू नका’, असे म्हटल्याने सायलीने अर्जुनपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता.

सायली अर्जुनच घर सोडून आपल्या माहेरी कुसुम ताईंकडे निघून गेली होती. आता रागावलेल्या सायलीचा रुसवा दूर करण्यासाठी अर्जुन आता रोज नव्या कल्पना शोधून काढत आहे. यातच आता तो चिमुकल्यांची मदत मागणार आहे.

WhatsApp channel