Tharala Tar Mag 9 September 2024 Serial Update: ‘ठरलं तर मग’ या मालिकेत आता पहिल्यांदाचं सायलीचं खरं कुटुंब एकत्र येताना पाहायला मिळणार आहे. मात्र, पुन्हा एकदा प्रिया या सुखी क्षणांमध्ये आपलं नाक खुपसण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र, यावेळी रविराज स्वतः प्रियाला अडवणार आहेत. यामुळे आता प्रियाच्या कावेबाजपणाला पहिल्यांदाच मोठा धक्का बसणार आहे. परंतु, सायलीच्या आयुष्यात पहिल्यांदाच आई-वडिलांचं प्रेम एकत्र मिळणार आहे. यामुळे आता मालीएकेच्या कथानकात आता एक मोठा ट्वीस्ट येणार आहे.
सुभेदार कुटुंबात यावर्षी सगळेच सण अतिशय जल्लोषात साजरे केले जात आहेत. २० वर्षांच्या एका मोठ्या प्रतीक्षेनंतर आता त्यांची लाडकी प्रतिमा घरी परतून आली आहे. त्यामुळे घरातील सगळ्यांमध्येच एक नवा उत्साह संचारला आहे. यामुळे आता सगळेच सण मोठ्या उत्साहाने आपले सगळे सण आणि समारंभ साजरे करत आहेत. आता सुभेदार कुटुंबामध्ये मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा होणार आहे. सायलीसह सगळे मिळून गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी करणार आहेत. यावेळी गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने सायलीला खास गिफ्ट मिळणार आहे.
सुभेदारांच्या घरातील प्रथेनुसार संपूर्ण कुटुंब एकत्र मिळून गणपती बाप्पाची आरती करतं. याच प्रथेनुसार आता रविराज, प्रतिमा आणि प्रिया यांना हा मिळाला आहे. प्रतिमा परतून आल्यामुळे आता बाप्पाची पहिली आरती आत्यानेच करावी, अशी सगळ्यांची इच्छा आहे. त्यामुळे आता प्रतिमा आत्या देखील सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन रविराज किल्लेदार यांच्यासोबत मिळून बाप्पाची आरती करणार आहे. आता सगळे जण तयार होऊन आरतीसाठी सकाळी प्रियाची वाट बघणार आहेत. मात्र, प्रिया अजून झोपून उठलेलीच नाही. त्यामुळे बाप्पाला ताटकळत ठेवणं कुणालाही पटलेलं नाही. यावर आता पूर्णा आजी एक उपाय शोधून काढणार आहेत.
बाप्पाला असं वाट बघत ठेवणं योग्य नाही. प्रतिमा सायलीला देखील आपली मुलगी मानते. तेव्हा आज प्रतिमा आणि रविराज यांच्यासोबत सायलीला आरती करण्याचा मन मिळावा आणि बाप्पाची आरती सुरू करावी, असे पूर्णा आजीने म्हटले आहे. त्यामुळे आता सायली आपल्या खऱ्या आई-वडिलांसोबत बाप्पाची आरती करणार आहे. आरती सुरू असताना आता प्रियाला जाग येणार असून, आपल्या ऐवजी सायलीला आरती करताना पाहून ती चिडणार आहे. त्यावेळी ती सायलीकडे जाऊन तिच्या हातातून पूजेचं ताटं खेचून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. ही आरती संपू दे मग तू इथे ये, असं सायली म्हणत असताना देखील प्रिया ऐकणार नाही. तर, यामुळे प्रतिमा देखील घाबरून जाणार आहे. हे पाहून चिडलेला रविराज आता प्रियाच्या कानाखाली आवाज काढणार आहे. येत्या भागात हे कथानक पाहायला मिळणार आहे.