‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात सायली आणि अर्जुन यांच्या प्रेमाच्या नात्यात मिठाचा खडा पडताना दिसणार आहे. सायलीने आपलं खरंच अर्जुनवर प्रेम असल्याची जाहीर कबुली दिली आहे. मात्र, अर्जुनला यावर विश्वास बसलेला नाही. आपल्यामुळे मिसेस सायलीला खोटं बोलावं लागत आहे, असा त्याचा समाज झाला आहे. सायलीला देवाची खोटी शपथ घ्यावी लागली, असं समजून अर्जुन प्रचंड दुःखी झाला आहे. अर्जुनला सायलीसाठी खूप वाईट वाटत आहे. यामुळे आता अर्जुन सायलीशी फार चुकीचं वागणार आहे. सायलीने स्वतःहून आपल्यावर चिडून निघून जावं, असा प्रयत्न तो करणार आहे.
चैतन्यने साक्षीला आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल सगळं सांगितलं हे ऐकून अर्जुन त्याच्यावर ओरडला होता. मात्र, नंतर समजून घेत आता पुढचा प्लॅन काय करायचा याकडे लक्ष देण्यास सांगितले. इकडे प्रिया आणि साक्षी, सायली आणि अर्जुनच्या लग्नाचं सत्य कसं घरातल्यांसमोर मांडायचं याच्यासाठी एक नवा डाव आखत आहे. पूर्णा आजीने चैतन्यला फोन केला होता. मात्र, चैतन्य हे सगळं खोटे आहे असे सांगितल्यामुळे आता साक्षीला चैतन्यवर वेगळा संशय येऊ लागलाय. चैतन्यने असं का केलं असेल? या प्रश्नाचे उत्तर आता साक्षी शोधणार आहे.
सायली आणि अर्जुनच हे लग्न आहे एक कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे आणि याचा काहीतरी पुरावा लिखित स्वरूपात नक्की कुठेतरी असेल, तो फक्त आपण शोधून काढला पाहिजे आणि तो जर आपल्या हाती लागला तर आपल्याला कोणाच्याही मदतीची गरज लागणार नाही, असं साक्षीला वाटतं आहे. इकडे सायली अर्जुनच्या प्रेमात पडली असून, तिने या प्रेमाची कबुली देखील दिली आहे. आता आपलं प्रेम अर्जुन समोर कसं जाहीर करायचं यासाठी ती काहीतरी स्पेशल करण्याचा विचार करत आहे. एकमेकांना बोलून सांगण्याऐवजी एकमेकांना पत्र लिहून आपल्या भावना सांगू असा विचार तिच्या मनात आला. मात्र, दुसरीकडे आता चैतन्य अर्जुनला त्याच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज मधील एका क्लॉजची आठवण करून देणार आहे. या करारामधील एका अटीनुसार मधुभाऊंची केस पूर्णपणे सुटत नाही, तोवर अर्जुन किंवा सायली हे प्रेमात पडू शकत नाही.
आता हा क्लॉज लक्षात आल्यानंतर आता अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. अर्जुन म्हणतो की, हा क्लॉज मी स्वतः टाकला होता. मात्र, याच्यात मीच अडकलो आहे. त्यामुळे आता अर्जुनने आपलं प्रेम लपवून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज तुटलं, तर सायली आपल्या आयुष्यातून निघून जाईल, याची धास्ती त्याला वाटत आहे. दुसरीकडे, आनंदात असलेली सायली अर्जुनला फोन करते, तेव्हा अर्जुन सायलीवर भडकतो. ‘मी ऑफिसमध्ये आहे. ऑफिसमध्ये याचा अर्थ कामात आहे आणि तुमचा फोन उचलत नाही, तर तुम्ही सारखा का फोन करता’, असं जोरात बोलून तो फोन ठेवून देणार आहे. आता सायलीला अर्जुनच्या या वागण्या मागचं कारण कळेल का? त्यामुळे ही दुखावली जाईल का आणि दोघांमधील गैरसमज दूर होऊ शकतील का? हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या