Tharala Tar Mag 9 July 2024 Serial Update: ‘ठरलं तर मग’ या मालिकेत आता अतिशय रंजक वळण पाहायला मिळत आहे. ‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात सायली अर्जुनकडे आपल्या मनातील खंत व्यक्त करताना दिसणार आहे. पूर्णा आजीने सायलीचा नातसून म्हणून स्वीकार केला आहे. इतकंच नाही तर, आपल्या संपूर्ण घराची जबाबदारी आणि तिजोरीच्या किल्ल्या देखील आजीने सायलीला देऊ केल्या आहेत. आजीने आपला स्वीकार केल्यामुळे सायली खूपच खुश झाली होती. तर, सुभेदारांच्या घरची सून म्हणून देखील पूर्णा आजीने आपल्याला मान्यता दिल्याने सायलीच्या आनंदाला उधाण आलं होतं. मात्र, तिचा हा आनंद फारच क्षणिक होता.
घरातल्यांनी आपला सून म्हणून स्वीकार केला असला, तरीही आपण या घरची घरी सून नाही ही गोष्ट सायलीच्या मनाला सतत टोचत आहे. आपण असं वागून पूर्णा आजींचा आणि घरातील सगळ्यांचाच विश्वासघात करतोय, असं सायलीच्या मनात येतं. या गोष्टीमुळे सायलीला झालेला सगळाच आनंद निघून जातो. एकीकडे सायली खूप खुश आहे. मात्र, दुसरीकडे हा आनंद आपला नाही हे लक्षात आल्यावर तिच्या मनाला फारच वाईट वाटत आहे. सायलीला दुःखी झालेलं पाहून अर्जुन देखील गोंधळात पडला होता. सायलीला आता आनंद झाला होता, मग आता असं काय झालं की ज्यामुळे ती रडू लागली, असा प्रश्न अर्जुनला पडला.
त्यावेळी त्याला उत्तर देताना सायली म्हणाली की, ‘मला स्वतःचीच लाज वाटत आहे. मला मोठ्या मनानं या घरची सून म्हणून सगळ्यांनी स्वीकारलं. या घराच्या किल्ल्या मला दिल्या. पण, या किल्ल्या माझ्या हक्काच्या नाहीत. या किल्ल्या त्याच व्यक्तीला मिळाल्या पाहिजेत, जी या घरची खरी सून असेल. मी या घरची सून नाही. त्यामुळे या चाव्यांवर माझा काहीही अधिकार नाही. या चाव्या स्वीकारून मी पूर्णा आजी आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची फसवणूक करतेत, ही गोष्ट आता माझ्याच मनाला अधिक बोचत आहे.’
सायलीचे हे बोलणं ऐकून आता अर्जुनच्या हे डोळ्यांतही पाणी येणार आहे. मधुभाऊंची केस पूर्ण होत नाही, तोवर आपल्याला सायलीला मनातील भावना सांगता येणार नाहीत, याचं दुःख आता अर्जुनला होत आहे. मात्र, ही केस आता लवकरात लवकर सोडवायचीच, असा निर्धार तिने मनाशी केला आहे. सायलीला झालेला क्षणिक आनंद तिला आयुष्यभर मिळावा यासाठी अर्जुन आता पूर्ण प्रयत्न करणार आहे.
संबंधित बातम्या