Tharala Tar Mag 8th December 2024 Serial Update: ‘ठरलं तर मग’ या मालिकेत सध्या अतिशय मजेशीर असा रुसव्या-फुगव्यांचा खेळ पाहायला मिळत आहे. रागवलेल्या सायलीची समजूत काढण्यासाठी आणि तिला घरी घेऊन येण्यासाठी अर्जुन आता सगळे प्रयत्न करत आहे. मात्र, त्याला आता कुसुम ताईंचा राग देखील सहन करावा लागणार आहे. अर्जुनने रागाच्या भरात सायलीवर आवाज चढवल्याने रागावलेली सायली घर सोडून निघून गेली आहे. मात्र, आता अर्जुनला तिचा दुरावा सहन होत नाहीये. त्यामुळे आता सायलीने परत यावं, यासाठी अर्जुन प्रयत्न करत आहे.
अर्जुन सायलीला तिच्या बोलण्याने आपल्याला त्रास होत असल्याचे म्हणाला होता. हे ऐकून सायलीने थेट अर्जुनपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे रागावलेली सायली अर्जुनचं घर सोडून आपल्या माहेरी निघून गेली होती. आता रागावलेल्या सायलीचा रुसवा दूर तरी कसा करावा, याच्या विचारात अर्जुन होता. त्याने आपल्या मनातील हीच खदखद चैतन्यला सांगितली. सायलीला पाहण्यासाठी आणि तिच्याशी बोलण्यासाठी अर्जुन आता व्याकूळ झाला आहे. आपल्या मित्राची अवस्था पाहून चैतन्यने अर्जुनला एक उपाय सांगितला. तू स्वतः जाऊन सायलीची माफी माग आणि तिला परत घेऊन ये, अशी कल्पना चैतन्यने अर्जुनला दिली होती. आता चैतन्यचं ऐकून अर्जुन माफी मागण्यासाठी सायलीकडे पोहोचला आहे.
मात्र, आता त्याला सायलीच्या ताईंचा म्हणजेच कुसुम ताईंच्या नाराजीचा सामना करावा लागणार आहे. सायलीची माफी मागून तिला घरी घेऊन जायला आलेल्या अर्जुनला कुसुमताई घरात शिरू देणार नाहीयेत. ‘तू तुला वाटेल तिथे जा, पण इथे येऊ नकोस. घरी जा, ऑफिसात जा किंवा कोर्टात जा.. पण सायलीसाठी इकडे येऊ नकोस’, असं कुसुम ताई अर्जुनला ठणकावून सांगणार आहेत.
आता कुसुम ताईंची समजूत घालून अर्जुन सायलीपर्यंत पोहोचू शकेल का? आणि सायली अर्जुनला स्वतःहून भेटेल का? तिचा रुसवा दूर होईल का? याची उत्तरं मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहेत.
संबंधित बातम्या