मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tharala Tar Mag: सायलीच्या आनंदात अर्जुन होणार सहभागी! ‘ठरलं तर मग’ मालिकेमध्ये आज काय घडणार?

Tharala Tar Mag: सायलीच्या आनंदात अर्जुन होणार सहभागी! ‘ठरलं तर मग’ मालिकेमध्ये आज काय घडणार?

Jul 08, 2024 02:05 PM IST

Tharala Tar Mag 8 July 2024 Serial Update: सुभेदारांच्या घरात आनंदीआनंद वातावरण आहे. पूर्णा आजीने सायलीचा नातसून म्हणून स्वीकार केल्यामुळे आता ती खूपच आनंदात आहे.

Tharala Tar Mag 8 July 2024 Serial Update
Tharala Tar Mag 8 July 2024 Serial Update

Tharala Tar Mag 8 July 2024 Serial Update:ठरलं तर मग’ या मालिकेत आता आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. सायलीच्या आयुष्यात खूप दिवसांनी आनंदाचे क्षण आले आहेत. सायलीच्या आयुष्यात आलेल्या या आनंदामुळे आता अर्जुन देखील सुखावला आहे. आता सुभेदारांच्या घरात आनंदीआनंद वातावरण आहे. पूर्णा आजीने सायलीचा नातसून म्हणून स्वीकार केल्यामुळे आता ती खूपच आनंदात आहे. आता अर्जुन देखील तिच्या या आनंदात सहभागी होणार आहे. आता पूर्णा आजीच्या या निर्णयामुळे सायलीच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत आहेत. मात्र, अर्जुनला बघून ती थबकली आहे.

पूर्णा आजीने आपला नातसून म्हणून आपला स्वीकार केल्यामुळे सायली मनापासून आनंदून गेली आहे. स्वतःच्या रूममध्ये जाऊन सायली घळाघळा आपल्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत असताना, तिथं अर्जुन येतो. अर्जुनच्या येण्याने सायली क्षणाभारासाठी जागी स्तब्ध झाली. मात्र, त्या क्षणी ती अर्जुनकडे वळून त्याला म्हणणार आहे की, ‘अर्जुन सर प्लीज मला हे आनंदाचे क्षण जगू द्या. आज जो हा आनंद मला मिळाला आहे, तो काही क्षणांसाठी का होईना, पण माझ्यासाठी खरा आहे. तो खोटा असल्याचे जाणवू देऊ नका प्लीज! आज पहिल्यांदा पूर्णा आजी माझ्याशी खूप चांगलं बोलल्या आहेत. त्यांनी मला प्रेमाने जवळ घेतलं आहे. माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. आजवर तुमची आजी म्हणून मी म्हणून मी पूर्णा आजीकडे बघत आले आहे. तुमची आजी म्हणून मला त्यांचा नेहमीच हेवा वाटायचा. माझ्याकडे स्वतःची आजी कधीच नव्हती. पण, आजपासून माझ्याकडे देखील एक आजी असणार आहे. माझी पूर्णा आजी!’

Dharmaveer 2 Teaser: माणुसकीत हिंदुत्व शोधणारा देवमाणूस! ‘धर्मवीर २’ चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला

अर्जुनलाही आनंद होणार!

सायली हे बोलत असताना तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून अर्जुनच्या मनात देखील आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. सायलीला इतकं खुश पाहून अर्जुनही मनोमन आनंदून गेला होता. सायलीशी अर्जुन म्हणाला की, ‘मिसेस सायली मी देखील तुमच्या या आनंदात सहभागी व्हायला आलो आहे. मी तुम्हाला काहीही बोलणार नाहीये. उलट तुम्हाला झालेला आनंद पाहून मला मनापासून खूप बरं वाटत आहे. ‘अर्जुनच्या तोंडातून हे ऐकताच सायली आणखीनच खुश झाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

घरातल्यांना सत्य कसं सांगणार?

सायली आणि अर्जुनने आपल्या लग्नाचं सत्य घरात सांगण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, सध्या घरात इतकं आनंदाचं वातावरण आहे आणि त्यातच पूर्णा आजीने सायलीचा स्वीकार देखील केला आहे. यामुळे आता हे सत्य कसं सगळ्यांना सांगायचं? हा मोठा प्रश्न दोघांसमोर उभा राहिला आहे. मालिकेच्या येत्या भागात रंजक कथानक पाहायला मिळणार आहे.

WhatsApp channel