‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात अर्जुन आणि सायलीचा प्लॅन आता फुकट जाताना पाहायला मिळणार आहे. मधुभाऊंच्या केसमधल्या मुख्य गुन्हेगाराला शोधण्यासाठी सायली आणि अर्जुनने एक प्लॅन तयार केला होता. या प्लॅननुसार त्यांनी मुख्य सूत्रधाराला फोन करून सगळे पुरावे आपल्याकडे असल्याचा आणि ते पुरावे घेऊन जाण्यासाठी आपल्याला भेटायला या, असा एक फोन केला होता. अर्जुन आणि सायलीच्या या फोनमुळे प्रिया चांगलीच घाबरून गेली होती. त्यांच्याकडे असे कोणते पुरावे आहेत, ज्यामुळे आपण गुन्हेगार असल्याचे सिद्ध होऊ शकतो, ते आपल्याला तातडीने मिळवले पाहिजेत, म्हणून प्रिया देखील ते पुरावे हस्तगत करण्यासाठी अर्जुन आणि सायलीने बोलावलेल्या ठिकाणी गेली होती.
सायली आणि अर्जुन प्रियाला रंगेहाथ पकडणार इतक्यातच चैतन्यने तिथे पोहोचून प्रियाला आधीच सावध करायचा प्रयत्न केला. सायली आणि अर्जुनने बोलावलेल्या ठिकाणी प्रिया पोहोचतात तिच्या मागे चैतन्य देखील तिथे पोहोचला. चैतन्यने अचानक प्रियाच्या तोंडावर हात ठेवून, तिला एका कोपऱ्यात बाजूला नेलं. हे पाहून घाबरलेली प्रिया आधी चैतन्यवर ओरडायला लागली. ‘तू माझा जीव घ्यायचा प्रयत्न करतोयस का?’, असा प्रश्न देखील प्रियाने केला. तर, ‘मी तुझा जीव घ्यायला नाही, मी तुझा जीव वाचवायला आलोय’, असं म्हणत चैतन्य तिला अर्जुनचा सगळा प्लॅन सांगितला. चैतन्यने तिला एका कोपऱ्यात लपलेले सायली आणि अर्जुन देखील दाखवले. शिवाय हा पाठवलेला माणूस अर्जुन माणूस असल्याचं चैतन्यने प्रियाला सांगितलं.
त्यावर, हे तुला कसं कळलं? तुला साक्षीनं पाठवलं का? तुला अर्जुनने ही गोष्ट सांगितली का? असा प्रश्न प्रिया चैतन्याला करते. तर, ‘अर्जुन हा आपला फार जवळचा मित्र होता, तो काय करू शकतो याची मला चांगलीच कल्पना आहे. त्यामुळे मी त्याच्यावर लक्ष ठेवून होतो आणि त्याचा हा प्लॅन माझ्या लक्षात आला म्हणून मी तुला वाचण्यासाठी इथे आलो आहे’, असे चैतन्य म्हणतो. साक्षी आणि प्रियाने काहीच केलं नसल्याचं आणि ते निर्दोष असलाच चैतन्यला वाटत आहे. त्यामुळे चैतन्य दोघींचीही मदत करत आहे.
मात्र, आपण असं करून गुन्हेगाराला मोकाट सोडत असून, त्याला पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या अर्जुनच्या अडचणी आणखी वाढवत असल्याचं चैतन्यला अजूनही लक्षात आलेलं नाही. चैतन्याच्या या प्रकारामुळे आता सायली आणि अर्जुनच्या हातात आलेली ही संधी देखील हुकणार आहे. पुन्हा एकदा गुन्हेगार सायली आणि अर्जुनच्या हातून निसटून जाणार आहे. आता सायली आणि अर्जुनच्या आयुष्यात एका नव्या व्यक्तीची एंट्री होणार असून, ही व्यक्ती कोण असणार आहे आणि ती काय करणार, हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.