Tharala Tar Mag 7th June 2024 Serial Update: ‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात अर्जुन आणि सायली त्यांच्या बाळाच्या स्वप्नातून बाहेर पडलेले पाहायला मिळाले आहेत. एकीकडे अर्जुनने साक्षी विरोधातील केस जिंकक्याने सुभेदारांच्या घरात सध्या आनंदाचे वातावरण आहे. कल्पनाच्या मनातील इच्छांबद्दल सांगत असताना सायली आणि अर्जुन दोघेही बाळाच्या स्वप्नात रंगले होते. मात्र, या स्वप्नातून बाहेर पडल्यावर, असं काहीही घडणार नाहीये त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी तूर्तास आईना आपण सध्यातरी बाळाची कुठलीही प्लॅनिंग नाही, असं सांगू म्हणजे त्यात शांत राहतील, असं ठरवतात.
इकडे प्रिया म्हणजेच खोटी तन्वी रविराज समोर प्रतिमाची डेडबॉडी कशी आणायची याचं प्लॅनिंग करत असते. त्याचवेळी पोलिसांचा फोन रविराजला येतो आणि ते म्हणतात की, त्यांना एक डेड बॉडी मिळाली आहे जी प्रतिमाच्या वर्णनाशी अगदी मिळतीजुळती आहे, तेव्हा तुम्ही या आणि तिची ओळख पटवून घ्या. हे ऐकून रविराजला मोठा धक्का बसतो. तर, नागराज आणि प्रिया देखील खोटं खोटं रडण्याचा नाटक करतात. त्यावेळी रविराज प्रियाला म्हणतो की, ‘तू रडू नकोस. देवाकडे प्रार्थना कर किती प्रतिमा नसेल, तोवर मी तिथे जाऊन येतो.’ त्यावेळी नागराज म्हणतो की, मीही तुमच्यासोबत तिथे येतो. तर, प्रिया देखील रविराजसोबत जाण्याचा हट्ट करते.
इथे महिपत तुरुंगातून साक्षीला फोन करून प्रत्येक गोष्टीच्या अपडेट्स घेत असतो. तुरुंगात माझ्याकडे फोन आहे, याबद्दल तुझ्याशिवाय कोणाला माहित नाही ना?, असं तो साक्षीला विचारतो. यावर साक्षी म्हणते की, ही गोष्ट कोणालाही माहित नाही. तर, महिपत चैतन्यबद्दल तिला विचारतो की, चैतन्यला तू ही गोष्ट सांगितलेली नाहीस ना? त्यावर साक्षी त्याला म्हणते की, चैतन्याला देखील ही गोष्ट माहित नाही. मात्र, चैतन्य पूर्णपणे आपल्या बाजूने आहे. तो कोर्टातही आपल्या बाजूने लढत होता. मात्र, महिपत तिला चैतन्यवर बारीक लक्ष ठेवायला सांगतो.
चैतन्य साखरपुड्याचे फोटो बघायचे आहेत, असे बोलून साक्षीकडून तिच्या मोबाईलचा अनलॉक पिन मागून घेतो आणि त्यानंतर किचनमध्ये काहीतरी जळण्याचा वास येतोय, असं बहाणा करून तो साक्षीला किचनमध्ये पाठवतो. साक्षी रूममधून निघून गेल्यानंतर तो तिच्या मोबाईलमध्ये महिपतीचा नंबर शोधू लागतो. इतक्यात साक्षी परत येते आणि त्याच्या हातातला मोबाईल बघते आणि म्हणते की, तुला तर फोटो बघायचे होते ना? मग, हे काय करतोयस? आता चैतन्याचा हा डाव साक्षीच्या लक्षात येणार का? आणि साक्षी चैतन्यवर संशय घेणार का? हे मालिकेच्या येत्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या