Tharala Tar Mag 7 October 2024 Serial Update : ‘ठरलं तर मग’ या मालिकेत आता प्रियाचा डाव सफल होताना दिसणार आहे. सायली आणि अर्जुनला त्रास देण्यासाठी आता प्रियाने प्रतिमा आत्यांचा वापर करण्याचा विचार केला आहे. इतकंच नाही तर, ती आता प्रतिमा आत्यांसोबत तिचा नवा डाव खेळायला सुरुवात केली आहे. प्रतिमा आत्यांची तब्येत अजूनही सुधारलेली नाही. त्यांची वाचा परत आली असली, तरी त्यांच्या आठवणी अजूनही परत आलेल्या नाहीत. तर, प्रतिमा आत्यांच्या आठवणी कधीच परतू नयेत, म्हणून प्रिया सतत प्रयत्न करत आहे.
प्रतिमा आत्यांच्या आठवणी परत आल्या, तर आपण खरी तन्वी नाही ही गोष्ट सगळ्यांसमोर येईल. तसेच, आपण सगळ्यांची फसवणूक केली हे कळल्यावर हे लोक आपल्याबरोबर काय करतील याची चांगलीच कल्पना असल्याने प्रिया खूप घाबरून गेली आहे. यातच आता अर्जुनने प्रियाला फसवल्याचं देखील तिला कळलं आहे. अर्जुनचं प्रियावर अजिबातच प्रेम नाही. मात्र, तरीही त्यांने तिच्याशी प्रेमाचं आणि मैत्रीचं खोटं नाटक केलं. ही गोष्ट आता प्रियाला चांगलीच त्रास देत आहे. तर, तुझ्यावर नाही तर, आपलं सायलीवर प्रेम असल्याचं देखील त्याने कबूल केलं आहे. आधीच डोक्यात राग असलेल्या प्रियाला सायलीचे नाव ऐकून आता प्रियाचा राग प्रचंड वाढला आहे.
त्यामुळे आता संतापलेली प्रिया थेट सायली आणि अर्जुन यांना त्रास न देता प्रतिमा आत्याला त्रास देण्यास सुरुवात करणार आहे. प्रतिमा आत्याला त्रास झाला की, सायली अर्जुनला आपोआप त्रास होणार हे प्रियाला चांगलंच माहीत आहे. त्यासाठी ती आता रविराजचा देखील वापर करणार आहे. सुभेदार कुटुंब एकत्र बसलेलं असताना प्रिया ‘आईला आपण घरी घेऊन जाऊया’, असं रविराजला म्हणणार आहे. ‘आई परत आल्यापासून ती आपल्या घरी आलेलीच नाही. ती स्वतःच्या घरी परत गेली, तर कदाचित तिच्या आठवणी परत येण्यास मदत होईल. त्यामुळे आपण तिला आता आपल्या घरी घेऊन जाऊया’, असं प्रिया आपल्या वडिलांना म्हणजेच रविराज किल्लेदार यांना म्हणणार आहे.
तर, प्रियाची ही गोष्ट आता घरातल्या सगळ्यांनाच पटणार आहे. त्यामुळे प्रतिमा आत्यांना देखील रविराज आणि प्रिया यांच्यासोबत त्यांच्या घरी जाण्याची तयारी करावी लागणार आहे. प्रतिमा आत्यांना मनातून सुभेदार कुटुंब सोडून कुठेही जायचं नाही. मात्र, आता रविराज आणि प्रिया यांच्यामुळे प्रतिमा आत्यांना हे घर सोडावे लागणार आहे. आपल्याला सायलीपासून दूर जावं लागणार ही कल्पनाच प्रतिमाला घाबरवत आहे. आता पुढे काय होणार याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.