Tharala Tar Mag 7 March 2024 Serial Update: अर्जुन सुभेदाराच्या घरात सध्या वादांचा मोठा गदारोळ सुरू आहे. यामध्ये अर्जुन आणि सायली पुन्हा एकदा अडकून पडणार आहेत. प्रताप सुभेदार यांना सोडवण्यासाठी महीपतने रचलेल्या सोंगामुळे आता तो घरातील सगळ्यांची मनं जिंकून घेत आहे. एकीकडे अर्जुनला सगळ्या गोष्टींची काहीच कल्पना नसल्याने तो प्रतापला म्हणजेच त्याच्या वडिलांना सोडवण्यासाठी तो पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला होता. मात्र, पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यावर त्याला प्रताप सुभेदार यांचा जामीन झाल्याचे कळले आहे. आता अर्जुनला महीपतबद्दल संशय येणार आहे. त्यामुळे अर्जुन तडक घरी पोहोचणार आहे.
अर्जुन आधीच खूप संतापलेला आहे. अर्जुनला रागात आत जाताना चैतन्य बघणार आहे. दुसरीकडे अर्जुन घरात गेल्यावर तो महीपतला डायनिंग टेबलवर बसून सगळ्यांसोबत गप्पा मारत खाताना बघणार आहे. हे बघून अर्जुनचा संताप आणखी वाढणार आहे. चिडलेला अर्जुन आता थेट महीपतची कॉलर पकडून, त्याला टेबलवरून उठवून त्याच्याशी वादावादी करणार आहे. या वादात महीपत जमिनीवर पडणार आहे. अर्जुनचं वागणं पाहून आता सगळेच सुभेदार त्याच्यावर चिडणार आहेत. प्रतापला जामीन देऊन सोडवून आणणाऱ्या महीपतला सगळेच देवाचा दूत मनात आहे. त्याच्याशी अर्जुन असा वागत असलेला पाहून आता प्रताप सुभेदार अर्जुनच्या श्रीमुखात भडकवणार आहेत.
एकीकडे घरात हा हंगामा सुरू असताना आता चैतन्य देखील बाहेरून घरात येणार आहे. चैतन्य घरात आल्यानंतर अर्जुनशी वाद घालू लागणार आहे. प्रताप सुभेदार यांना अटक झाली आणि जामीन मिळेपर्यंत तू कुठे होतास, असा प्रश्न चैतन्य अर्जुनला करणार आहे. यानंतर चैतन्य आणि अर्जुन यांच्यात देखील वादावादी पाहायला मिळणार आहे. यामुळेच आता चैतन्य आणि अर्जुनमधील वाद सगळ्यांसमोर येणार आहेत. सायलीने ही गोष्ट सगळ्यांपासून लपवण्याचा खूप प्रयत्न केला होता. मात्र, तिचा हा प्रयत्न आता फोल ठरणार आहे. चैतन्य आणि अर्जुन यांना भांडताना पाहून सगळ्यांनाच खरं काय ते कळणार आहे.
या वादात आता प्रियामध्ये पडून सगळा आरोप सायलीवर ढकलण्याचा प्रयत्न करणार आहे. सायलीमुळेच चैतन्य आणि अर्जुन यांच्यात वाद झाले आणि दुरावा आला, असे प्रिया म्हणणार आहे. ‘तुला मधुभाऊंना सोडवायचं आहे, तुझा स्वार्थ आहे आणि म्हणूनच तू साक्षीवर खुनाचा आळ घेतला. तू मुद्दाम असं बोलतेस आणि सगळ्यांमध्ये आग लावतेस’, असे प्रिया म्हणणार आहे. आता पूर्णा आजी देखील सायलीवर आरोपांच्या फैरी झाडणार आहे. मात्र, सायलीवर आरोप सुरू असताना अर्जुन खंबीरपणे साथ देणार आहे.