Tharala Tar Mag 7 July 2024 Serial Update: ‘ठरलं तर मग’ या मालिकेत खूप दिवसांनी सुभेदारांच्या घरात आनंदाचं वातावरण पाहायला मिळणार आहे. आता पूर्णा आजीचा सायलीवरचा राग निवळू लागला आहे. सायली आपल्या कुटुंबाची काळजी घेतेय, हे आता पूर्णा आजीच्या लक्षात येऊ लागलं आहे. सायली आता पूर्णा आजीच मनं जिंकून घेण्यात यशस्वी ठरली आहे. आता अखेर सायलीच्या आयुष्यात तो आनंदाचा क्षण येणार आहे. पूर्णा आजी आता स्वत:हून घराच्या चाव्या सायलीच्या ताब्यात देणार आहे. यामुळे सायलीच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येणार आहेत.
नुकताच या मालिकेत अर्जुन सायली आणि आजीवर रागावलेला दिसला आहे. प्रियामुळेच अर्जुन आणि पूर्णा आजी यांच्यामध्ये बाचाबाची झाली होती. पूर्णा आजी प्रियाची बाजू घेऊन अर्जुनशी बोलायला जात होती. मात्र अर्जुनने प्रियाविषयी काहीही बोलण्यास किंवा अर्जुनने सरळ नकार दिला होता. ‘तुम्हीच तिला प्रतिमा आत्याची मुलगी समजून डोक्यावर बसवलेत आणि त्यामुळेच ती अशी वागत असते’, असं म्हणत अर्जुन पूर्णा आजीलाच सुनावलं होतं. त्यामुळे दोघेही एकमेकांशी बोलत नव्हते. मात्र, अर्जुनचा हा राग आणि त्याचा अबोला पूर्णा आजीला सहन झाला नाही. पूर्णा आजी आता खूपच दुःखी झाली होती. अर्जुन बोलतच नाहीये यामुळे पूर्ण आजी चांगलीच काळजीत पडली होती.
पूर्ण आजीची हीच काळजी आता सायलीने बघवत नसल्याने, तिने एक प्लॅन बनवला होता. आता सायली हा प्लॅन पूर्णा आजीला जाऊन सांगते. ‘अर्जुन सर तुमच्यावर रागावू शकत नाही, मी तुम्हाला एक आयडिया देते’, असं म्हणत सायली आजीला सगळा प्लॅन सांगते. सायली आजीला सांगते की, ‘पूर्णा आजी तुम्ही खाली जाऊन, तुम्हाला खूप त्रास होत असल्याचं नाटक करा. तुम्हाला खूपच आजारी वाटतंय, असं सगळ्यांना भासवा. तुम्हाला आजारी असल्याचं पाहून अर्जुन सरांचा राग झटकन निघून जाईल आणि ते स्वतःहून तुमच्याकडे बोलायला येतील.’
सायलीचा हा प्लॅन आपल्या पूर्णा आजीला देखील आवडला आणि आजी तिच्या या प्लॅनमध्ये सामील झाली. आता पूर्णा आजी खाली गेल्यानंतर अर्जुनने तिचं हे नाटक क्षणात पकडलं. इतकंच नाही तर हा प्लॅन सायलीचा होता, हे देखील त्याच्या लक्षात आलं. यानंतर सगळेच हसू लागले. त्यामुळे सुभेदारांच्या घरातील राग-रुसव्यांचे ढग मावळून जातात. सायली आपल्या कुटुंबाला बांधून ठेवण्यासाठी जे प्रयत्न करतेय, ते बघून पूर्णा आजी खुश होते आणि घराच्या व तिजोरीच्या चाव्या सायलीला देते.
संबंधित बातम्या