मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tharala Tar Mag 7th Feb: अबोल सायलीचं नवं रूप पाहून अर्जुनला बसला गोड धक्का! ‘ठरलं तर मग’ रंजक वळणावर

Tharala Tar Mag 7th Feb: अबोल सायलीचं नवं रूप पाहून अर्जुनला बसला गोड धक्का! ‘ठरलं तर मग’ रंजक वळणावर

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 07, 2024 12:18 PM IST

Tharala Tar Mag 7 February 2024 Serial Update: प्रियाने सायलीच्या ड्रिंकमध्ये मद्य मिसळून तिला आता बेधुंद केलं आहे. सायलीला देखील दारू चढल्याने आता ती विचित्र वागू लागली आहे.

Tharala Tar Mag 7 February 2024
Tharala Tar Mag 7 February 2024

Tharala Tar Mag 7 February 2024 Serial Update: सायली आणि अर्जुन यांची हनिमून ट्रीप आता वेगळं वळण घेणार आहे. एकीकडे अर्जुन सायलीच्या प्रेमात आकंठ बुडत चालला आहे. तर, दुसरीकडे सायली मात्र त्याच्या या प्रेमापासून अनभिज्ञ आही. मात्र, आता त्यांच्या आयुष्यात एक अशी घटना घडणार आहे, ज्यामुळे अर्जुन आपल्या मनातील प्रेम सायलीसमोर कबूल करणार आहे. सायली आणि अर्जुन यांच्या मागोमाग प्रिया देखील माथेरानमध्ये पोहोचली आहे. ती आता दोघांमध्ये फूट पडण्यासाठी प्रयत्न करताना दिसणार आहे. मात्र, तिच्यामुळेच आता अर्जुन आणि सायली एकमेकांच्या जवळ येणार आहेत.

प्रिया सायली आणि अर्जुनच्या मागावर असताना, आता ते दोघे मात्र घरी जाणायची तयारी करत होते. माथेरानमधली हनिमून तरीप आवरून आता सायली आणि अर्जुन घरी जायला निघालेच होते की, हॉटेलचे मालक अर्थात अर्जुनच्या वडिलांच्या मित्राने त्यांना थांबण्याचा आग्रह केला. इतकंच नाही, तर त्यांनी सायली आणि अर्जुन यांना एका खास डिनर पार्टीसाठी निमंत्रण देखील दिलं होतं, आता नाईलाजास्तव अर्जुन आणि सायलीला या हॉटेलमध्ये थांबावं लागलं होतं. तर, आता या गोष्टीबद्दल कळताच प्रियाने देखील वेटरचा वेश धारण करून या पार्टीत शिरकाव केला.

Terava: स्त्रीशक्तीचं अनोख दर्शन घडवणारा 'तेरवं'; चित्रपटातून दिसणार एका कणखर स्त्रीची गोष्ट!

प्रियाने सायलीच्या ड्रिंकमध्ये मद्य मिसळून तिला आता बेधुंद केलं आहे. सायलीला देखील दारू चढल्याने आता ती विचित्र वागू लागली आहे. सायली या पार्टीत उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या टेबलवर जाऊन त्यांच्या ताटातील पदार्थ खाणार आहे. तर, जोरजोराने गाणी वाजवून डान्स करणार आहे. या दरम्यान अर्जुन तिथे नसल्याने आता सायली आणखीनच आऊट ऑफ कंट्रोल होणार आहे. मात्र, योग्य वेळेत तिथे पोहोचलेला अर्जुन सगळ्यांची माफी मागून सायलीला तिथून घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु, आता सायलीला इथून बाहेर घेऊन जाणं अर्जुनसाठी देखील कठीण झालं आहे.

कसबसं तिची समजूत काढून अर्जुन तिला रूममध्ये घेऊन जाणार आहे. तर, रूममध्ये जाऊन सायली झोपेचं नाटक करणार आहे. अर्जुन बाहेर जाताच सायली पुन्हा एकदा मोठ्याने गाणी वाजवून बेडवर उड्या मारून डान्स करू लागणार आहे. सायलीच्या या गोंधळामुळे हॉटेलमधील सगळेच लोक त्यांच्या रूम बाहेर जमा होणार आहेत. आता अर्जुन सायलीला हॉटेलमधून बाहेर घेऊन जाणार आहे. परंतु, बाहेर जाऊन देखील सायलीच्या या हरकती सुरूच राहणार आहेत. तर, नेहमी शांत आणि अबोल असणाऱ्या सायलीचं हे मनमोकळं रूप पाहून आता अर्जुनला देखील गोड धक्का बसणार आहे.

WhatsApp channel