Tharala Tar Mag 7 August 2024 Serial Update: ‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात भन्नाट गंमत पाहायला मिळणार आहे. या मालिकेत आता प्रिया सायली आणि अर्जुनच्या घरात राहायला आली आहे. प्रतिमा आत्याच्या आठवणी परत याव्या, म्हणून तिला सुभेदारांच्या घरात राहण्याची परवानगी मिळाली आहे. मात्र, प्रिया स्वतःच्या आईसाठी म्हणजेच प्रतिमा आत्यासाठी सुभेदारांच्या घरात राहत नसून, तिचा एकच उद्देश आहे आणि तो म्हणजे अर्जुनला मिळवणे. अर्जुनने सायलीला सोडून आपल्याशी लग्न करावं, यासाठी प्रिया सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. दुसरीकडे, अर्जुन देखील आश्रम केसमधलं सत्य प्रियाकडून काढून घेण्यासाठी तिच्याशी मैत्रीचं नाटक करतोय.
मात्र, आता अर्जुनचं हेच धाडसी पाऊल त्याच्या आणि सायलीच्या नात्यासाठी घातक ठरणार आहे. अर्जुनने मैत्रीचं नाटक केल्याने आता प्रिया सतत त्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, तिने अजूनही आश्रम केस संदर्भात अर्जुनला काहीही सांगितलेलं नाही. त्यामुळे तो देखील प्रियाशी प्रेमानेच वागत आहे. तिच्याशी हटकून वागलो तर, तिचा आपल्यावरचा विश्वास उडेल. म्हणून अर्जुनही प्रियाशी जपूनच वागत आहे. दुसरीकडे प्रियाला असं वाटत आहे की, अर्जुन आणि सायली यांचं नातं बिनसलं असून, आता अर्जुन तिला घटस्फोट देऊन आपल्याशी लग्न करू शकतो, म्हणून प्रिया देखील अर्जुनला आपलंसं करण्याचे सगळे प्रयत्न करत आहे.
प्रियाचे हेच प्रयत्न आता सायलीच्या लक्षात आले आहेत. मात्र, सायलीने तिला इशारा देताच प्रियाने तिला उलट शब्दात उत्तर दिलं. ‘तुझ्या नवऱ्याला माझ्या भोवती फिरायला लावते की, नाही बघ’, असं म्हणत प्रियानेच सायलीला सुनावलं. मात्र, प्रियाच्या या धमकीमुळे आता सायली देखील टेन्शनमध्ये आली आहे. सायलीने अर्जुनला घडला प्रकार देखील सांगितला. तरीही प्रिया सतत अर्जुनच्या मागे पुढे करण्याचा प्रयत्न करत आहे. आता प्रिया अर्जुनसाठी त्याची आवडती कॉफी घेऊन जाणार आहे. तर, अर्जुन देखील प्रियाला नाही म्हणण्याऐवजी तिच्या हातातील कॉफी घेऊन ती पिणार आहे.
दोघांच्या याच गप्पागोष्टी सुरू असताना सायली त्यांना बघणार आहे. आपण इतकं सांगून देखील अर्जुन प्रियाशी तसाच वागतोय, हे पाहिल्यानंतर आता सायलीला अर्जुनचा भयंकर राग येणार आहे. प्रियामुळे आता सायली आणि अर्जुन यांच्यामध्ये भांडण होणार आहे. अर्जुनला प्रिया सोबत कॉफी पिताना बघून चिडलेली सायली आता त्याला दिवसभर फक्त कॉफी प्यायला देणार आहे. आपल्याला प्रिया सोबत कॉफी पिताना सायलीने बघितलं ही गोष्ट माहित नसल्यामुळे आता सायलीच्या वागण्याने अर्जुन गोंधळून जाणार आहे. मालिकेच्या येत्या भागात हे धमाकेदार कथानक पाहायला मिळणार आहे.