Tharala Tar Mag 6th Mar: प्रिया आणि सायलीमध्ये होणार खडाजंगी! ‘ठरलं तर मग’ मालिका रंजक वळणावर
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tharala Tar Mag 6th Mar: प्रिया आणि सायलीमध्ये होणार खडाजंगी! ‘ठरलं तर मग’ मालिका रंजक वळणावर

Tharala Tar Mag 6th Mar: प्रिया आणि सायलीमध्ये होणार खडाजंगी! ‘ठरलं तर मग’ मालिका रंजक वळणावर

Mar 06, 2024 03:37 PM IST

Tharala Tar Mag 6th March 2024 Serial Update: प्रताप सुभेदार यांना अटक झाली आहे. तर, याच संधीचा फायदा घेऊन आता प्रियाने सुभेदारांच्या घरात एन्ट्री घेतली आहे.

Tharala Tar Mag 6th March 2024 Serial Update
Tharala Tar Mag 6th March 2024 Serial Update

Tharala Tar Mag 6th March 2024 Serial Update: सुभेदारांच्या घरात सध्या हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. एकीकडे प्रताप सुभेदार यांना अटक झाली आहे. तर, दुसरीकडे याच संधीचा फायदा घेऊन आता प्रियाने सुभेदारांच्या घरात एन्ट्री घेतली आहे. आता प्रिया सायलीचं स्थान डळमळीत करण्याचा प्रयत्न करत आहे. आधीच पूर्णा आजी सायलीवर संतापली आहे. ‘मी तुला सून मनात नाही. तू कोणत्या अधिकाराने आमची बाजू मांडण्यासाठी पत्रकारांसमोर गेलीस? तू घरात आल्यापासून या गोष्टी होऊ लागल्या आहेत’, असे म्हणत पूर्णा आजीने सायलीचं मन दुखावलं आहे. मात्र, तरीही सायली सगळ्या सुभेदारांना सावरत आहे. यातच आता प्रियाने येऊन पूर्णा आजीच्या मनात आणखी विष कालवायला सुरुवात केली आहे.

प्रताप सुभेदार यांना अटक झाल्यामुळे आता कल्पनाची तब्येत बिघडली आहे. तर, आता प्रिया सुभेदारांच्या घरात येऊन सगळ्या पत्रकारांना समजावून तिथून परत पाठवून देणार आहे. यानंतर ती घरात येऊन सगळ्यांना सावरण्याचा प्रयत्न करणार आहे. तर, या सगळ्यात सायलीला कसा कमीपणा दाखवता येईल याचा प्रयत्न प्रिया करत आहे. प्रियाचा हा सगळा प्लॅन सायलीच्या लक्षात आला आहे. सायली घरात येताच बघते की, प्रिया स्वयंपाक घरात जाऊन सगळ्यांसाठी सरबत बनवत आहे. यावेळी तिला काही गोष्टी सापडत नाहीत. यावेळी सायली तिथे येऊन प्रियाला समज देणार आहे. ‘हे माझं घर आहे. माझ्या घरात काय आणि कुठे ठेवलंय, याची माहिती फक्त मलाच आहे. त्यामुळे तू त्यात पडू नकोस’, असे ती प्रियाला सांगणार आहे.

यानंतर आता प्रिया पुन्हा एकदा बाहेर येऊन पूर्णा आजी आणि अस्मिता यांना आपल्या बाजूने वळवण्यात यशस्वी ठरणार आहे. इथे बाहेर बसून पूर्णा आजी आणि अस्मिता प्रियाचं कौतुक करणार आहेत. तर, प्रिया आता आजीला देव पाण्यात ठेवण्याचा सल्ला देणार आहे. यामुळे बाबा लवकर घरी परतून येतील, असे ती आजीला सांगणार आहे. आता मात्र, सायलीचा संताप अनावर होणार आहे. ती पुन्हा एकदा प्रियाला फैलावर घेणार आहे. ‘आश्रमात असतानासुद्धा तू अशाच गोष्टी करायचीस. मधुभाऊंविरुद्ध तू खोटी साक्ष दिलीस. त्यामुळेच ते तुरुंगात अडकले आहेत. आता त्या महिपत आणि साक्षीने बाबांना अडकवलं आहे. माझ्या घरच्यांचा गैरफायदा घेणे बंद कर, त्यांच्यापुढे मी ढाल बनून उभी असेन कायम’, असं सायली प्रियाला म्हणणार आहे. त्यामुळे आता प्रिया पुरती घाबरली असली, तरी ती सुभेदार कुटुंबातील काही लोकांचा आश्रय घेणार आहे.

Whats_app_banner