Tharala Tar Mag: प्रिया सायलीला जीवे मारण्याचा प्रयत्न करणार! ‘ठरलं तर मग’मध्ये आज काय घडणार?-tharala tar mag 6 september 2024 serial update priya will try to kill sayali what will happen today ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tharala Tar Mag: प्रिया सायलीला जीवे मारण्याचा प्रयत्न करणार! ‘ठरलं तर मग’मध्ये आज काय घडणार?

Tharala Tar Mag: प्रिया सायलीला जीवे मारण्याचा प्रयत्न करणार! ‘ठरलं तर मग’मध्ये आज काय घडणार?

Sep 06, 2024 01:39 PM IST

Tharala Tar Mag 6 September 2024 Serial Update: आता प्रिया सायलीला पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न करणार आहे. सायलीला प्रियाने जिन्यावरून ढकलून दिले होते. यामुळे सायलीला गंभीर दुखापत झाली होती.

Tharala Tar Mag 6 September 2024
Tharala Tar Mag 6 September 2024

Tharala Tar Mag 6 September 2024 Serial Update: ‘ठरलं तर मग’ या मालिके आज पुन्हा एकदा एक धक्कादायक वळण पाहायला मिळणार आहे. सायली आता बरी होऊन घरी परतल्यामुळे सुभेदारांच्या घरात आनंदाचे वातावरण आहे. सगळेच खूप खूश झाले आहेत. आता सुभेदार कुटुंबात गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू होणार आहे. या सगळ्यात आता प्रियाचा मात्र खूप जळफळाट होणार आहे. प्रिया सायलीला अर्जुन्पासून कसं दूर करता येईल, याचा विचार करत आहे. यासाठी ती आता सायलीला जीवे मारण्याचा प्रयत्न करणार आहे. आता ती यासाठी हरतालिकेचा दिवस निवडणार आहे.

आता प्रिया सायलीला पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न करणार आहे. सायलीला प्रियाने जिन्यावरून ढकलून दिले होते. यामुळे सायलीला गंभीर दुखापत झाली होती. या दुखापतीत सायलीच्या डोक्याला मार लागला होता. त्यामुळे ती बेशुद्ध पडली होती. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता सायली या अपघातातून बरी झाली आहे. त्यामुळे तिला डॉक्टरांनी घरी पाठवले आहे. आता सायली घरी परतली आहे. सायलीने घरी येताच आता सगळ्या घराची सूत्र आपल्या हातात घेतली आहेत. मात्र, सायली जिन्यावरून पडली कशी आणि ती रुग्णालयात असल्याचं प्रतिमाला कुणी सांगितलं, असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

Tharala Tar Mag: तर तुमच्या आधी माझा जीव गेला असता; अखेर मनातील भावना अर्जुनच्या ओठी आल्याच!

प्रतिमा आत्या करणार मोठा खुलासा

अखेर आता प्रतिमा आत्या त्यांना सायलीच्या तब्येतीबद्दल कुणी सांगितलं याचा खुलासा करणार आहे. सगळ्यांसमोर प्रतिमा आत्या प्रियाकडे बोट करून तिने आपल्याला हे सांगितल्याचे सांगणार आहे. त्यामुळे आता घरातील सगळेच प्रियावर बरसणार आहे. सायलीच्या अपघाताबद्दल प्रतिमाला काहीही सांगायचं नाही, हे आधीच सांगितलेलं असताना पण प्रियाने असं का केलं, असा जाब तिला सगळे विचारणार आहेत. यावर प्रिया आपल्याला याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगणार आहे.

प्रिया सायलीला मारण्याचा प्रयत्न करणार!

सायली आणि प्रतिमा दोघीही जिवंत असल्यामुळे आता प्रियाच्या अडचणी वाढल्या आहेत. एकीकडे सायली बरी झाली आहे, तर, दुसरीकडे प्रतिमा आत्यावर झालेला हल्ला अर्जुनला कळला आहे. त्यामुळे आता प्रिया चांगलीच बिथरली आहे. ती आता सायलीला मारण्याचा प्रयत्न करणार आहे. यासाठी ती सायलीच्या दुधात झोपेच्या गोळ्या मिसळणार आहे. जास्तीच्या गोळ्या टाकून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न करणार आहे. आता अर्जुन सायलीला यातून वाचवू शकेल का?, हे मालिकेच्या येत्या भागातून कळणार आहे.