मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  प्रियाचा चोंबडेपणा सायलीला पडणार भारी! द्यावी लागणार प्रेमाची परीक्षा; ‘ठरलं तर मग’मध्ये येणार वळण!

प्रियाचा चोंबडेपणा सायलीला पडणार भारी! द्यावी लागणार प्रेमाची परीक्षा; ‘ठरलं तर मग’मध्ये येणार वळण!

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 06, 2024 03:19 PM IST

प्रिया आता सुभेदारांच्या घरी पोहोचली आहे. त्यानंतर ती पूर्णा आजी आणि अस्मिता यांना जाऊन सगळं सत्य सांगणार आहे.

प्रियाचा चोंबडेपणा सायलीला पडणार भारी! द्यावी लागणार प्रेमाची परीक्षा; ‘ठरलं तर मग’मध्ये येणार वळण!
प्रियाचा चोंबडेपणा सायलीला पडणार भारी! द्यावी लागणार प्रेमाची परीक्षा; ‘ठरलं तर मग’मध्ये येणार वळण!

ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजचा भागात एक धक्कादायक वळण पाहायला मिळणार आहे. प्रिया सुभेदारांच्या घरी येऊन पूर्णा आजीला आणि सगळ्यांनाच सायली आणि अर्जुन यांच्या लग्नाचे सत्य सांगणार आहे. एकीकडे चैतन्य आता अर्जुनला भेटण्यासाठी त्याच्या ऑफिसमध्ये जाणार आहे. तर, भरपूर दिवसांनी ऑफिसमध्ये आलेल्या चैतन्यला पाहून अर्जुनला देखील खूप आनंद होणार आहे. हळूहळू त्यांच्या मैत्रीत आलेला हा दुरावा आता संपणार आहे. आता या गप्पांच्या ओघातच अर्जुन चैतन्यकडे त्याच्या सायलीवरील प्रेमाची कबुली देणार आहे. ‘तू मला आधीपासूनच सांगत होतास की, सायलीवर माझं प्रेम आहे, पण मीच ते मान्य करत नव्हतो. पण, आता मला जाणवले की, माझं खरंच सायलीवर प्रेम आहे आणि मला स्वतःवरच विश्वास बसत नाहीये’, असं अर्जुन त्याला म्हणणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

चैतन्य अर्जुनचं हे बोलणं ऐकून खूप खुश होणार आहे. मात्र, त्याचवेळी त्याला आठवणार आहे की, आपण साक्षीला अर्जुन आणि सायलीच्या लग्नाचे सत्य सांगितले आहे. मात्र, तो ही गोष्ट अर्जुनपासून लपवून ठेवणार आहे. दुसरीकडे, साक्षीनं अर्जुन आणि सायलीच्या लग्नाचं सत्य प्रियाला देखील सांगितलं आहे. आता प्रियालाही हे कळल्यामुळे ती सध्या खूप खुश असून, अर्जुनशी लग्नाची दिवा स्वप्न पाहत आहे. मात्र, आता हे सत्य लवकरात लवकर सुभेदार कुटुंबाला कधी सांगेन, असं प्रियाला झालं आहे. परंतु, कुठलेच पुरावे नसल्याने ती गप्प बसली आहे. मात्र, आता हे सत्य आपण लवकरच आजीच्या समोर आणू, असा निर्धार देखील तिने केला आहे.

परदेशवारी करणाऱ्या मुक्ता बर्वेला येतेय मायदेशाची आठवण! पोस्ट लिहित म्हणाली, ‘मी आत्ता भारतात नाहीये…’

प्रिया करणार चोंबडेपणा!

एकीकडे अर्जुन चैतन्यला सायली बद्दल भरभरून गोष्टी सांगत आहे. आपण कसे तिच्या प्रेमात पडलो आणि आपण तिच्या प्रेमावरची कबुली का देऊ शकत नाहीये, याचं कारण देखील तो चैतन्यला सांगतो. दुसरीकडे, प्रिया आता सुभेदारांच्या घरी पोहोचली आहे. त्यानंतर ती पूर्णा आजी आणि अस्मिता यांना जाऊन सगळं सत्य सांगणार आहे. तर, सायली आणि अर्जुन यांच्या लग्नाचं हे सत्य ऐकून त्यांनाही धक्का बसणार आहे. केवळ मधुभाऊंना वाचवण्यासाठी अर्जुनने सायलीशी लग्न केले आणि त्यांच्या या संदर्भात एक करार झाला होता, असं प्रिया त्यांना सांगणार आहे.

सायली देणार प्रेमाची कबुली!

सायलीला अर्जुनची फी देता येत नव्हती आणि अर्जुनला माझ्याशी लग्न करायचं नव्हतं म्हणूनच या दोघांनी हे खोटं नाटक करून सगळ्यांनाच फसवलं, हे ऐकताच पूर्ण आजी भडकते आणि असं असेल तर मी सायलीला या घरात राहून देणार नाही, असं म्हणत आता ती सायलीला घराबाहेर काढण्यासाठी निघणार आहे. तर, प्रियाला हे सत्य चैतन्याने सांगितलं, असं ती सगळ्यांना सांगत आहे. सुभेदार कुटुंबातील सगळेच सदस्य सायलीवर सत्य सांगण्यासाठी दबाव टाकणार आहेत. मालिकेच्या येत्या भागात सायली या दबावाखाली आपल्या प्रेमाची कबुली देताना दिसणार आहे.

IPL_Entry_Point