Tharala Tar Mag 6 June 2024 Serial Update: ‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात अर्जुन आणि सायली बाळाची स्वप्न रंगवताना दिसणार आहेत. कल्पना सतत सायलीच्या मागे स्वतःची काळजी घे असा धोशा लावून आहे. ती सतत सायलीला अर्जुनचे लहानपणीचे फोटो दाखवत आहे. दुसरीकडे, तिच्यासाठी सुक्या मेव्याचे लाडू आणि तीन स्वेटर देखील कल्पनाने बनवले आहे. आपल्याला लवकर नातवंड मिळावी म्हणून कल्पना सायलीची पूर्ण काळजी घेत आहे. तिने लवकरच आपल्याला आनंदाची बातमी द्यावी आणि आपल्याला आजी करावं अशी कल्पनाची इच्छा आहे. मात्र. हे सायली आणि अर्जुनचं हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असल्याची कल्पना अजूनही तिला आलेली नाही.
दुसरीकडे कल्पनाच्या मनातील या इच्छा आता सायली अर्जुनला देखील सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. अर्जुन घरी आल्यावर कल्पना त्याला सायलीची काळजी घेण्यास सांगणार आहे. मात्र, सायलीची काळजी का घ्यावी? ती आजारी पडली आहे का? असा प्रश्न अर्जुनला पडणार आहे. दुसरीकडे, आता सायली कल्पनाच्या मनातील सगळ्या इच्छा अर्जुनला सांगणार आहे. कल्पना आई आजी व्हायची स्वप्न बघत असल्याचं सायली अर्जुनला सांगणार आहे. इतकंच नाही तर, कल्पना आईला देखील आपल्या बाळाची स्वप्न पडू लागली आहे आणि त्यांच्या अपेक्षा आपल्याकडून वाढू लागल्या आहेत, असं देखील सायली अर्जुनला सांगणार आहे.
दुसरीकडे अर्जुन सायली आपल्यासाठी कॉफी घेऊन यायला सांगणार असून, सायली अर्जुनसाठी कॉफी आणायला गेल्यावर अर्जुन स्वतः देखील बाळांच्या स्वप्नात रमणार आहे. त्या बाळाला शाळेत जाण्यासाठी सायली त्याची तयारी करत असताना, आपल्या दोघांच्या गडबडीत सायलीचा चांगलाच गोंधळ उडेल, असं स्वप्न तो बघत असतो. इतक्यात सायली कॉफी घेऊन वर येते आणि अर्जुन हे स्वप्न तुटतं. तो दचकून उठलेला पाहून, सायली त्याला काय झालं असं विचारते. यानंतर दोघे मिळून बाळाची स्वप्न रंगवायला लागतात.
दुसरीकडे, कल्पना त्यांना पाहून आता हे दोघं खरंच बाळाला जन्म देण्याचा विचार करत आहेत, असं समजून खुश होते. मात्र, कल्पनाची ही इच्छा कधीच पूर्ण होऊ शकत नाही. सायली आणि अर्जुन बाळाचा विचार करत असल्याचा गैरसमज आता कल्पनाच्या मनात निर्माण होणार आहे. यामुळे ती सायलीची अजूनच काळजी घेताना दिसणार आहे. दुसरीकडे, सुभेदारांच्या घरात प्रतिमाच्या मृत्यूच्या नवा खेळ रंगणार आहे. प्रियाने प्रतिमासारखीच दिसणारी एक डेड बॉडी शवागारातून बाहेर आणून, ती पोलिसांनी दाखवली आहे. आता ही डेड बॉडी म्हणजे प्रतिमा असल्यासचे मानून सगळेजण तिचे क्रियाकर्म करण्यासाठी तयार होणार आहे.
संबंधित बातम्या