Tharala Tar Mag: तुझ्या नवऱ्याला माझ्याभोवती फिरवते की नाही बघ! प्रियाने सायलीला दिलं थेट चॅलेंज-tharala tar mag 6 august 2024 serial update priya threaten sayali and tries to trapped arjun ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tharala Tar Mag: तुझ्या नवऱ्याला माझ्याभोवती फिरवते की नाही बघ! प्रियाने सायलीला दिलं थेट चॅलेंज

Tharala Tar Mag: तुझ्या नवऱ्याला माझ्याभोवती फिरवते की नाही बघ! प्रियाने सायलीला दिलं थेट चॅलेंज

Aug 06, 2024 02:24 PM IST

Tharala Tar Mag 6 August 2024 Serial Update:अर्जुनची आवडती कॉफी त्याला त्याच्या हातात नेऊन देण्यापासून ते त्याला ऑफिसमध्ये रवाना करण्यापर्यंतची कामं प्रिया स्वतःहून करत आहे.

Tharala Tar Mag 6 August 2024 Serial Update
Tharala Tar Mag 6 August 2024 Serial Update

Tharala Tar Mag 6 August 2024 Serial Update:ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात धामेकदार कथानक पाहायला मिळणार आहे. खोट्या तन्वीने म्हणजेच प्रियाने आता सुभेदारांच्या घरात एन्ट्री मिळवली आहे. प्रिया आता अर्जुनच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असून, ती सतत सायलीला अर्जुनपासून दूर ठेवत आहे. दुसरीकडे प्रतिमा आत्या इतर सगळ्यांनाच घाबरत असल्यामुळे सायलीला सतत प्रतिमा आत्यासोबतच राहावं लागत आहे. त्यामुळे ती अर्जुनला पुरेसा वेळ देऊ शकत नाही. याचाच फायदा घेऊन आता प्रिया सतत अर्जुनच्या मागेपुढे करताना दिसतेय.

अर्जुनची आवडती कॉफी त्याला त्याच्या हातात नेऊन देण्यापासून ते त्याला ऑफिसमध्ये रवाना करण्यापर्यंतची कामं प्रिया स्वतःहून करत आहे. मात्र, ही गोष्ट सायलीला आता अजिबात आवडत नाहीये. तर, अर्जुन मात्र या सगळ्याकडे दुर्लक्ष करून आपली काम पूर्ण करण्याकडे लक्ष देत आहे. एकीकडे प्रतिमा आत्या घरात आली असली तरी, दुसरीकडे आपण ज्या बाईची डेड बॉडी प्रतिमा आत्या समजून जाळली, ती कोण होती? असा प्रश्न आता अर्जुनच्या मनात येत आहे. हाच प्रश्न आता तो रविराजकडे देखील उपस्थित करणार आहे.

Bigg Boss Marathi 5: मैत्रीणच मैत्रिणीवर उलटली! निक्की निक्की करणाऱ्या जान्हवी किल्लेकरचा सूर अचानक बदलला!

अर्जुनने उपस्थित केला प्रश्न!

अर्जुन रविराजला विचारणार आहे की, ‘सीनियर प्रतिमा आत्या घरी आली याचा आनंद आहेच. पण आपण प्रतिमा त्या म्हणून ज्या बाईंची डेड बॉडी जाळली, त्या बाई कोण होत्या आणि त्या बाई जर आपल्या कुणीच लागत नव्हत्या, तर त्यांचा आणि तन्वीचा डीएनए कसा काय मॅच झाला?’ अर्जुनच्या या प्रश्नामुळे आता रविराज देखील गोंधळात पडणार आहे. अर्जुनचा हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा असून यामुळेच घरात चाललेल्या सगळं गौडबंगाल समोर येण्याची शक्यता आहे.

सायली-प्रियाचं जोरदार वाजणार!

दुसरीकडे प्रियाची चाललेली नाटकं सायलीने बरोबर हेरली आहेत. सायली आता प्रियाला धमकावताना दिसणार आहे. एखाद्या बाईला जर तिच्या नवऱ्याजवळ परकी स्त्री गेलेली दिसली, तर ती बाई अशीच वाघीण होते आणि त्या दुसऱ्या परक्या बाईचा कोथळा बाहेर काढते, असं म्हणून सायली प्रियाला धमकावण्याचा प्रयत्न करते. मात्र, ‘तुझ्याच घरात राहून तुझ्या डोळ्यादेखत तुझ्या नवऱ्याला माझ्या पाठी फिरायला लावते की, नाही बघ. हे माझं चॅलेंज आहे तुला’, असं म्हणत प्रिया देखील आता सायलीला उलट उत्तर देणार आहे. दोघींच्या या भांडणात अर्जुन काय करणार हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये कळणार आहे.