Tharala Tar Mag 5 September 2024: ‘ठरलं तर मग’ या मालिकेत आता अर्जुन आणि सायली यांच्या नात्यात आता प्रेम फुलताना दिसणार आहे. या मालिकेत आता सायली आणि अर्जुन दोघेही एकमेकांना आपल्या मनातील भावना सांगताना दिसणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या नात्यात अनेक अडचणी आल्या आहेत. मात्र, या अडचणींवर त्यांनी नेहमीच मात केली आहे. दोघेही प्रत्येक पावलावर एकमेकांना साथ देत आहेत. सायली आजारी पडल्याने आता अर्जुन तिची खूपच काळजी घेत आहे. या दरम्यान आता अर्जुनच्या मनातील भावना तिच्या तोंडावर येणार आहेत.
प्रियामुळे सायलीचा अपघात झाला होता. मात्र, सायली आता घरी परतून आली असली, तरी तिने अद्याप कुणालाही अपघातामागील सत्य सांगितलेलं नाही. सायली जिन्यावरून पडली कशी, हा प्रश्न आता सगळ्यांनाच पडला आहे. मात्र, सायली याचं उत्तर देणं टाळत आहे. मात्र, सायली हॉस्पिटलमध्ये असताना प्रतिमा आत्यांवर देखील हल्ला झाला होता, ही गोष्ट कुणीच सायलीला सांगितली नव्हती. आता सायलीला ही गोष्ट कळली आहे. पण, मला कुणीच कसं सांगितलं नाही?, असा विचार करून सायली सगळ्यांवर संतापली आहे. आता सायली अर्जुनवर देखील रागावली आहे.
आता रागावलेली सायली अर्जुनला या संबंधात प्रश्न विचारणार आहे. तेव्हा अर्जुन काकुळतीला येऊन सायलीला सगळं समजवून सांगणार आहे. अर्जुन सायलीला म्हणतो की, ‘मिसेस सायली तुम्हाला आम्ही हे सगळं कसं सांगणार होतो? तुम्ही आधीच खूप आजारी होतात. तुमची तब्येत सुधारत नव्हती. अशात जर तुम्हाला हे सांगितलं असतं तर तुम्हाला अजून धक्का बसला असता. तुम्हाला काही झालं असतं तर... तुमच्या आधी माझा जीव गेला असता.’ आता नकळत अर्जुनच्या तोंडून मनातील भावना ओठांवर येतात. तर, अर्जुनला इतकं व्याकूळ झालेलं पाहून आता सायली देखील हैराण झाली आहे. तिला अर्जुनच्या डोळ्यातील प्रेम आता दिसू लागणार आहे.
मात्र, अर्जुन वेळीच स्वतःच्या भावनांना आवर घालणार आहे. तर, सायली मात्र अर्जुन असा का वागत आहे, याचा विचार करून गोंधळात पडली आहे. मात्र, दोघेही यावेळी देखील आपल्या भावना व्यक्त करणार नाहीत. दुसरीकडे, प्रिया आता चांगलीच वैतागली आहे. सायली आणि प्रतिमा दोघी जिवंत राहिल्यामुळे तिच्या अडचणी वाढल्या आहेत. ती आता सायलीला जीवानिशी ठार करण्याचा प्रयत्न करणार आहे.
संबंधित बातम्या