Tharala Tar Mag 5 October 2024 Serial Update: ‘ठरलं तर मग’ या मालिकेत आता प्रेक्षकांना एक अनपेक्षित वळण पाहायला मिळणार आहे. अर्जुन आणि सायलीवर सूड उगवण्यासाठी प्रिया आता प्रतिमाचा वापर करणार आहे. यामुळे आता प्रतिमा आत्याला देखील त्रास सहन करावा लागणार आहे. अर्जुनच्या वागण्यामुळे आता प्रियाला मोठा धक्का बसला आहे. अर्जुनचं आपल्यावर प्रेम नाही, तो हे सगळं नाटक करत असल्याचं समोर आल्यावर आता प्रिया चांगलीच वैतागली आहे. आपण फसवलो गेलोय, हे लक्षात येताच आता प्रिया प्रचंड चिडली आहे. याचाच बदला आता ती घेणार आहे.
प्रतिमा आत्यांना शोधून आणल्यापासून सायली त्यांची खूप काळजी घेत होती. प्रतिमा आत्या देखील सुभेदारांच्या घरीच राहत होती. सुभेदार कुटुंबासोबत राहत असताना प्रतिमा आत्या आता सगळ्या धक्क्यातून सावरत आहेत. अथक प्रयत्नांनंतर आत प्रतिमा आत्याचा आवाज परत आला आहे. यामुळे सगळेच खूप खूश आहेत. असंच हळूहळू प्रतिमा आत्यांची गेलेली स्मृती देखील परत येईल, असं सगळ्यांना वाटत आहे. त्यामुळे सगळेच प्रतिमा आत्यांची खूप काळजी घेत आहेत. मात्र, आता प्रिया हीच संधी साधून प्रिया प्रतिमा आत्याचा वापर करून अर्जुन आणि सायलीवर सूड उगवण्याचा प्रयत्न करणार आहे.
प्रियाने अर्जुनवरील प्रेमाची कबुली देण्यासाठी खूप तयारी केली होती. मात्र, अर्जुनने या सगळ्याला नकार देत प्रियाचं प्रेम झिडकारलं. यामुळे प्रिया आधीच चिडलेली असताना, आता अर्जुनने त्याचं सायलीवर प्रेम असल्याचं देखील म्हटलं. यामुळे प्रियाचा पारा चांगलाच चढला आहे. अर्जुनला मिळवण्यासाठी प्रियाने खूप प्रयत्न केले होते. मात्र, तिचे सगळे प्रयत्न फोल ठरत आहेत. अर्जुनने आपल्याला थेट नकार देऊन आपला मोठा अपमान केलाय, असं वाटून प्रिया आता प्रचंड संतापली आहे. आता अर्जुन आणि सायलीकडून या अपमानाचा बदल घ्यायचाच, असा विचार करून प्रिया नवीन प्लॅन तयार करत आहे. आता तिला प्रतिमा आत्यांची आठवण येणार आहे.
प्रिया सगळ्यांसमोर खोटी तन्वी बनून वावरत आहे. त्यामुळे प्रतिमा आपली आई आहे आणि आपलं तिच्यावर खूप प्रेम आहे, असं ती सगळ्यांना दाखवत आहे. मात्र, प्रतिमाच्या आठवणी परत येऊ नयेत, म्हणून प्रिया तिला सतत त्रास देत आहे. आता सायली आणि अर्जुनपासून प्रतिमाला दूर नेण्यासाठी प्रिया तिला किल्लेदारांच्या घरी घेऊन जायचा प्लॅन करणार आहे. प्रिया रविराज आणि सगळ्यांसमोर हा प्रस्ताव ठेवणार आहे. आता प्रिया प्रतिमाला घरी घेऊन जाऊ शकेल का, हे मालिकेच्या येत्या भागात कळणार आहे.
संबंधित बातम्या