Tharala Tar Mag 5 May: सायली आणि अर्जुन पाहतायत ‘आई-बाबा’ होण्याचं स्वप्न! बाळाच्या निमित्ताने एकत्र येणार?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tharala Tar Mag 5 May: सायली आणि अर्जुन पाहतायत ‘आई-बाबा’ होण्याचं स्वप्न! बाळाच्या निमित्ताने एकत्र येणार?

Tharala Tar Mag 5 May: सायली आणि अर्जुन पाहतायत ‘आई-बाबा’ होण्याचं स्वप्न! बाळाच्या निमित्ताने एकत्र येणार?

Jun 05, 2024 02:22 PM IST

Tharala Tar Mag 5 May 2024: कल्पना आई आपल्याकडून नातवंडाची अपेक्षा करते आहे ही गोष्ट आता सायलीला अर्जुनला सांगायची आहे. सायलीच्या मनात खूप सार्‍या गोष्टी असतात.

सायली आणि अर्जुन पाहतायत ‘आई-बाबा’ होण्याचं स्वप्न! बाळाच्या निमित्ताने एकत्र येणार?
सायली आणि अर्जुन पाहतायत ‘आई-बाबा’ होण्याचं स्वप्न! बाळाच्या निमित्ताने एकत्र येणार?

ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात अर्जुन आणि सायली एकमेकांशी व्हिडीओ कॉलवर बोलताना दिसणार आहेत. कल्पना आई आपल्याकडून नातवंडाची अपेक्षा करते आहे ही गोष्ट आता सायलीला अर्जुनला सांगायची आहे. सायलीच्या मनात खूप सार्‍या गोष्टी असतात. मात्र, आई आपल्या दोघांबद्दल... इतकंच बोलून सायली शांत होते. दुसरीकडे, अर्जुन वेगळाच विचार करतो आणि म्हणतो की, आईला आपला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल कसं कळलं? तो सायलीला असा प्रश्न विचारत असताना ती त्याला थांबायला सांगते. इतक्यात तिकडे कल्पना येते आणि ती सायलीला कुणाशी बोलतेयस, असं विचारायला लागते. तर, सायली आपण अर्जुनशी व्हिडीओ कॉलवर बोलत असल्याचं सांगते.

दुसरीकडे प्रियाने आपलं नाव नाटक सुरू केलं आहे. प्रिया आणि नागराज यांनी मिळून शवागारातून एक मृतदेह आणला आहे. आता हा महिलेचा मृतदेह आपल्या आईचा म्हणजेच प्रतिमाचा असल्याचा भासवून खोटी तन्वी अर्थात प्रिया रविराजला इमोशनल करण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रिया खोटं नाटक करते की, तिला तिच्या स्वप्नात आई दिसली. हे नाटक करून तिला तो मृतदेह रविराजसमोर आणायचा असतो, म्हणून ती मुद्दाम तोंडाला पाणी लावून घाम आल्याचं नाटक करत धावत धावत रविराजकडे येते आणि सांगते की, मला खूप वाईट स्वप्न पडलं. त्यावर रविराज तिला विचारतो की, तू स्वप्नात काय पाहिलं? तेव्हा ती सांगते की, ‘आई निपचित पडलेली होती. तिचा श्वास थांबला होता आणि आजूबाजूला आपण बसून रडत होतो, हे चित्र मी स्वप्नात पाहिलं’. हे ऐकल्यानंतर रविराजही काळजीत पडतो.

महाराष्ट्राच्या मातीतला अस्सल 'रांगडा' अनुभव; कुस्ती अन् बैलगाडा शर्यतीचा थरार मोठ्या पडद्यावर दिसणार!

प्रिया करणार नाटक!

तेव्हा प्रिया मुद्दाम नाटक करत रविराजला म्हणते की, ‘बाबा तुम्ही लवकर आईला शोधा. मला आई शिवाय राहणं कठीण होत चाललं आहे.’ हे ऐकल्यावर रविराजलाही आपल्या लेकीची काळजी वाटू लागते. त्यावेळेस तो पोलिसांना फोन करून प्रतिमाचा शोध सुरू आहे ना?, असं विचारतो. खरंतर हा प्रिया आणि नागराजचा डाव असतो. मात्र, तो रविराजच्या लक्षात येत नाही. प्रिया आणि नागराज या दोघांनाही त्याला एका डेड बॉडी जवळ न्यायचं असतं. पण, डायरेक्ट बॉडीजवळ घेऊन गेलो, तर त्याला संशय येईल. म्हणून प्रियाने हा प्लॅन रचलेला असतो.

सायली-अर्जुन रमणार बाळाच्या स्वप्नात!

आता अर्जुन घरी परतून येणार आहे. त्या वेळी कल्पना अर्जुनला सांगते की, तू आता सायलीची काळजी घ्यायला हवी आणि सायलीकडे लक्ष द्यायला हवं. खरं तर हे त्या दोघांचा स्वप्न असतं. दोघेही बाळाची आठवणीत स्वप्नात रमतात. मात्र, एकमेकांना टाळी द्यायला जाताना त्यांच्या लक्षात येतं की, हे सगळं केवळ त्यांचं स्वप्न होतं. मात्र, आता या स्वप्नासाठी तरी ते एकत्र येतील का?, हे पाहणं रंजक ठरणार आहे.

Whats_app_banner