Tharala Tar Mag 5th Feb: दारू पिऊन सायली करणार माथेरानमध्ये तमाशा? प्रियाचा डाव सफल होणार?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tharala Tar Mag 5th Feb: दारू पिऊन सायली करणार माथेरानमध्ये तमाशा? प्रियाचा डाव सफल होणार?

Tharala Tar Mag 5th Feb: दारू पिऊन सायली करणार माथेरानमध्ये तमाशा? प्रियाचा डाव सफल होणार?

Published Feb 05, 2024 06:24 PM IST

Tharala Tar Mag 5 February 2024 Serial Update: सायली आणि अर्जुन यांना सतत एकत्र बघून प्रियाचा म्हणजेच खोट्या तन्वीचा चांगलाच तिळपापड होत आहे.

Tharala Tar Mag 5 February 2024
Tharala Tar Mag 5 February 2024

Tharala Tar Mag 5 February 2024 Serial Update:ठरलं तर मग’ या मालिकेत आजच्या भागात अर्जुन सायलीला शिव मंदिरात दर्शन करण्यासाठी घेऊन जाताना दिसणार आहे. सायली मंदिरात जाऊन आपल्या घरातील आणि सुभेदार कुटुंबातील सगळ्यांसाठी काहीना काही मागत आहे. सायलीने प्रत्येकासाठी आनंद मागून आता देवळातून बाहेर पडणार आहे. मात्र, अर्जुन तिला थांबवून पुन्हा मंदिरात जाणर आहे. आपल्याला बाहेर सोडून अर्जुन सर पुन्हा मंदिरात का गेले? या प्रश्नाने सायली वैतागणार आहे. तर, दुसरीकडे अर्जुन मंदिरात जाऊन देवाकडे सायलीसाठी मागणं मागणार आहे.

अर्जुन पुन्हा देवळात जाऊन देवाकडे सायलीसाठी आनंद मागणार आहे. अर्जुन देवळात जाऊन बोलणार आहे की, ‘देवा आता तुझ्यासमोर जी मुलगी येऊन गेली, तिने सगळ्यांसाठी आनंद मागितला असेल आणि सगळ्यांची दुःख स्वतःसाठी मागितली असतील. पण देवा तिला कोणतंही दुःख देऊ नको. तिची सगळी दुःख मला दे आणि सगळा आनंद तिला दे.’ इतकं बोलून अर्जुन पुन्हा मंदिराबाहेर येणार आहे. मात्र, सायलीला अर्जुनचं हे विचित्र वागणं कळत नाहीये. त्यामुळे ती गोंधळून गेली आहे. मात्र, आता अर्जुन तिला घेऊन पुन्हा आपल्या हॉटेल रूममध्ये जाणार आहे.

Kiran Gaikwad: अखेर गुपित उलगडलं! रिलेशनशिप पोस्टनंतर किरण गायकवाडनं चाहत्यांना दिलं खास सरप्राईज!

दुसरीकडे अर्जुन आणि सायलीला हनिमूनला पाठवल्यामुळे पूर्ण आजी कल्पनावर रागावली आहे. तर, कल्पना मात्र आजीला समजावणीच्या सुरात सगळ्या गोष्टी सांगताना दिसणार आहे. सायली सुभेदारांची सून म्हणून पूर्णा आजीला आवडत नाही. तन्वीने आपल्या घरची सून व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. पूर्णा आजी खोट्या तन्वीला म्हणजेच प्रियाला तन्वी समजत आहेत. तर, कल्पना आता त्यांना सायलीबद्दल चांगल्या गोष्टी सांगून त्यांचं मन वळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. सायली आणि अर्जुन एकमेकांवर प्रेम करतात, हे देखील कल्पना पूर्णा आजीला पटवून देणार आहे.

सायली आणि अर्जुन यांना सतत एकत्र बघून प्रियाचा म्हणजेच खोट्या तन्वीचा चांगलाच तिळपापड होत आहे. सायली आणि अर्जुनचं नातं खोटं आहे, हे सिद्ध करण्यासाठी प्रियाला काहीच पुरावा मिळत नाहीये. त्यात सायली आणि अर्जुन यांचा रोमान्स देखील बघावा लागत आहे. आता सायली आणि अर्जुन हॉटेलवर येऊन पुन्हा घरी परतण्याची तयरी करताना दिसणार आहेत. मात्र, त्यावेळी हॉटेलचे मालक त्यांच्यासाठी खास डिनर पार्टी ठेवणार आहेत. या वेळी प्रिया सायलीच्या कोल्डड्रिंकमध्ये काहीतरी मिसळणार आहे. आता हे मद्यमिश्रित पेय प्यायल्यानंतर सायली काय धिंगाणा घालणार, हे आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.

Whats_app_banner