Tharala Tar Mag: प्रियाच्या वागण्यामुळे सायली आणि अर्जुनमध्ये निर्माण होणार अबोला? मालिकेत आज काय घडणार?-tharala tar mag 5 august 2024 serial update priya tries to ruin sayali and arjun s married life ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tharala Tar Mag: प्रियाच्या वागण्यामुळे सायली आणि अर्जुनमध्ये निर्माण होणार अबोला? मालिकेत आज काय घडणार?

Tharala Tar Mag: प्रियाच्या वागण्यामुळे सायली आणि अर्जुनमध्ये निर्माण होणार अबोला? मालिकेत आज काय घडणार?

Aug 05, 2024 01:49 PM IST

Tharala Tar Mag 5 August 2024 Serial Update: त्यामुळे आता प्रियाला सुभेदारांच्या घरात राहण्याची परवानगी मिळाली आहे. मात्र, याच परवानगीचा आता प्रिया गैरवापर करणार आहे.

Tharala Tar Mag 5 August 2024
Tharala Tar Mag 5 August 2024

Tharala Tar Mag 5 August 2024 Serial Update:ठरलं तर मग’ या मालिकेमध्ये आता सायली आणि अर्जुनमध्ये दुरावा निर्माण होताना दिसणार आहे. या दुराव्याला निमित्त प्रिया ठरणार आहे. प्रतिमा आत्या परतून घरी आल्यामुळे आता प्रियाने देखील तन्वी म्हणून सुभेदारांच्या घरात राहण्याचा हट्ट केला आहे. तर, प्रिया प्रतिमाच्या जवळपास राहिली तर प्रतिमाला तिची स्मृती परत मिळवण्यात मदत होईल, असे सगळ्यांना वाटत आहे. त्यामुळे आता प्रियाला सुभेदारांच्या घरात राहण्याची परवानगी मिळाली आहे. मात्र, याच परवानगीचा आता प्रिया गैरवापर करणार आहे. प्रिया आता अर्जुनशी जवळीक साधायचा प्रयत्न करणार आहे.

सायलीने स्वतः प्रतिमा आत्याला शोधून पुन्हा सुभेदारांच्या घरी आणलं आहे. त्यामुळे आता सगळेच सायलीवर खुश आहेत. मात्र, प्रतिमा आत्या २० वर्षांपूर्वी झालेल्या अपघातामुळे त्यांची वाचा आणि स्मृती दोन्हीही गमावून बसल्या आहेत. सायलीने त्यांना शोधून आणल्यामुळे त्या केवळ सायलीलाच ओळखत आहेत. त्यांना केवळ सायली जवळच सुरक्षित असल्यासारखं वाटत आहे. घरातील इतर कोणतीही व्यक्ती त्यांच्या जवळ गेली असता, त्या खूप घाबरून जातात. त्यामुळे सायली सतत प्रतिमा आत्यांसोबतच राहत आहे. प्रतिमा आत्याच्या जेवण खाण्यापासून ते त्यांना झोपवण्यापर्यंत सगळ्या गोष्टी सायली अतिशय प्रेमाने करताना दिसतेय.

Bigg Boss Marathi 5: अरे हा अरब घेतला कशाला?; ‘बिग बॉस मराठी ५’च्या ‘या’ स्पर्धकावर संतापले प्रेक्षक! नेमकं काय झालं?

प्रिया घेतेय सायली नसल्याचा फायदा!

सायली सतत प्रतिमा आत्यांच्या सोबत असल्यामुळे तिला अर्जुनकडे लक्ष देता येत नाहीये. तिचा सगळा वेळ प्रतिमा आत्यांचं काम करण्यात जात असल्याने सायलीला अर्जुनसाठी वेळच मिळत नाहीये. याच संधीचा फायदा साधून आता प्रिया अर्जुनशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहे. सायली रूममध्ये नाही हे बघून प्रिया त्यांच्या रूममध्ये शिरते आणि अर्जुनशी लगट करण्याचा प्रयत्न करते. मात्र, अर्जुन प्रियाला सतत टाळण्याचा प्रयत्न करतो. एकीकडे तिच्याकडून सत्य वदवून घ्यायचा आहे म्हणून तिच्याशी त्याला गोड वागावं लागत आहे. तर, दुसरीकडे ती सायली नसल्याचा फायदा घेतेय, हे देखील त्याच्या लक्षात आलं आहे.

सायली चिडणार!

आता प्रिया मुद्दामहून अर्जुनची काळजी घेण्याचं नाटक करणार आहे. अर्जुन कामासाठी निघत असताना त्याला रोज कॉफी लागते ही गोष्ट प्रियाला कळली आहे. मात्र, अर्जुनला सायलीच्या हातचीच कॉफी आवडते, हे तिला माहीत नाही. त्यामुळे आता अर्जुन कामाला जात असताना सायली त्याची कॉफी बनवत असते. तर, दुसरीकडे प्रिया आधीच कॉफी तयार करून अर्जुनच्या पुढ्यात नेऊन ठेवते आणि त्याला म्हणते की, ही घे तुझी कॉफी बनवली आहे. तर, अर्जुन देखील घाईत असल्याने तीच कॉफी पिऊन निघून जातो. दुसरीकडे, अर्जुनसाठी कॉफी बनवत असलेली सायली हे पाहून चांगलीच चिडते. आता यामुळे दोघांमध्ये भांडण होताना दिसणार आहेत.